राज्य उत्पादन शुल्क सोलापुर विभागाकडून ३६.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त .
सोलापूर
दि.१०:राज्य उत्पादन शुल्क सोलापुर विभागाच्या भरारी पथकाने महात्मा गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने रु.३६.९५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे वतीने २ऑक्टोबर ते ०८ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये दारूबंदी सप्ताह राबवण्यात आला. या कालावधीमध्ये भरारी पथकाने विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील अवैद्य मद्य निर्मिती,विक्री,वाहतूक विरोधात संयुक्तरित्या मोहिम राबविण्यात आली.विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोलापुर जिल्हयाच्या अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर. विभागामार्फत सदरच्या एकूण १२० गुन्हे नोंद करण्यात आले. यात १०१ आरोपींवर कारवाई करण्यात आली असुन २३ वाहनांसह सदर कारवाईत ४० हजार ३० लिटर इतके गुळ मिश्रीत रसायन, ३ हजार २३८ लिटर तयार हातभट्टीची दारु, १ हजार ३०८ लिटर ताडी, १५३ लिटर देशी दारु, ८३ लिटर विदेशी दारु, १९ लिटर बियर व १३६ लिटर फ्रुट बियर असा एकूण ३६ लाख ९५ हजार ३९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक एस. आर. पाटील, निरीक्षक जे.एन. पाटील, ओ.व्ही. घाटगे, पंकज कुंभार, एस.जी. भवड, आर.एम.चौरे, बी.एम.बामणे, दुय्यम निरीक्षक श्रीमती, अंजली सरवदे, धनाजी पोवार, रमेश कोलते, सुखदेव सिद, समाधान शेळके, दत्तात्रय लाडके, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बापू चव्हान, बाळु नेवसे, सौरभ भोसले, रविंद्र भुमकर, प्रभाकर कदम, गणेश कुदळे, मृदुला बहुधान्ये शिवकुमार कांबळे, अमित नांगरे, एम.यु.वाघ. एस.एस.गुठे, लक्ष्मण भागुजी लांघी सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश मधुकर चव्हान ,एस.पी.चव्हान, एम.बी.जाधव, जी.व्ही.भंडारे, एस.ए. बिराजदार, व्ही.एस.पवार, व सर्व जवान संवर्गातील कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी अवैध मद्य विक्री,वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात येणार असुन अवैध मद्य विक्री,वाहतूक विरोधात विविध पथके नियुक्त केले आहेत, सदर पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतुकी विरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस ॲप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.