maharashtrapoliticalsocialsolapur

उत्साही वातावरणात ‘ब्रतुकम्मा’ मध्ये रमल्या तीन हजार लाडक्या बहिणी…

सेवालय फाउंडेशन व क्रीडा भारतीचा उपक्रम...

सोलापूर : प्रतिनिधी

भव्य ब्रतुकम्मा, सजविलेले मैदान अन् शेकडो महिलांचा सहभाग अशा उत्साही वातावरणात ‘ब्रतुकम्मा’ मध्ये तीन हजार लाडक्या बहिणी रमल्या. निमित्त होते सेवालय फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे व क्रीडा भारतीतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित ब्रतुकम्माचे.

  1. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर पद्मशाली सखी संघम, रुद्र बहुद्देशीय संस्था, कल्पना बहुद्देशीय संस्था, रोझ क्लब व माऊली उद्योग या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हा भव्य उपक्रम झाला. ब्रतुकम्माचे उद्घाटन सेवालय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी गौरम्मा देवीचे पूजन प्रफुल्लता काळजे आणि मनिष काळजे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, सुरेखा बोमड्याल, श्रीमती सरिता वडनाल, क्रीडा भारतीचे प्रांत मंत्री ज्ञानेश्‍वर म्याकल यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर ब्रतुकम्मा खेळ सुरू झाला. महिलांनी खूपच सुंदर खेळ सादर केला. आलेल्या प्रत्येक महिलेला भेट वस्तू देण्यात आल्या. लोकगीते म्हणत उत्कृष्टपणे खेळ सादरीकरण केलेल्या ५१ महिलांची कंचीपट्टू साडीसाठी तीन फेऱ्यांमधून निवड करण्यात आली. रेणुका बुधारम यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

  • कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सखी संघमच्या मेघा इट्टम, रूद्र बहुउद्देशिय संस्थेचे प्रभाकर म्याकल, बंडगर सर, कल्पना बहुउद्देशिय संस्थेच्या कल्पना अर्शनपल्ली, रोझ क्लबच्या ममता बोलाबत्तीन, माऊली उद्योग समुहच्या लता म्याकल, कला चन्नपट्टण, रूक्मीणी गंदमल, रेखा पुल्ली, महिला समन्वयिका सारिका रूद्रोज, वनिता सुरम, तुलसी दासरी, मंजुळा आडम, अर्चना दोंता, अंकिता वल्लमदेशी, पद्मसेना प्रतिष्ठानचे अनिल दासरी, विनोद केंजरला, बालाजी कुंटला, शशांक म्याकल, राजू दासरी , श्रीनिवास दासरी, वैभव म्याकल, सेवालय फौंडेशनचे वेणू कोंकत्ती व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
    ————–
    चौकट

शासकीय योजनांचे महिलांनी केले कौतुक

ब्रतुकम्मा खेळाच्या मैदानात विविध शासकीय योजनांचे फलक लावण्यात आले होते. या फलकांवर योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणीसाठी विविध योजना आणल्या आहेत. यातून महिला भगिनींना आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. या विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी याप्रसंगी केले. या योजनांचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button