पोलीस अधीक्षक, सोलापूर यांचे हस्ते पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गणेश मंडळांना पारितोषिक वितरण…

सोलापूर
सन 2024 मध्ये साजरा करण्यात आलेल्या श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान सामाजिक सलोखा राहण्या करीता सोलापूर तालुका,पोलीस ठाणेच्या अंतर्गत गावातील गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत म्हणुन मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पेनेतुन मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या वतीने जनजागृती केली होती.
त्या करीता गणेश मंडळा करीता सर्वोत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील एकूण 120 गणेश मंडळाचे परीक्षण व मुल्यमापन करीता राज सांळुखे व आतिश गवळी या दोघांच्या पथकांनी केले आहे. त्यामध्ये गुणांकन क्रमांका नुसार मौजे बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ यांनी प्रथम क्रमांक, मौजे बोरामणी येथील जयलक्ष्मी तरूण मंडळ यांनी व्दितीय क्रमांक, मौजे मार्डी येथील नागेश युवक मंडळ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
उत्तेजनार्थ म्हणुन होनसळ येथील जय श्रीराम मंडळ व हगलुर येथील जय हनुमान तरूण मंडळ यांना मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीण उपविभागाच्या स्तरावर मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सोलापूर उपविभागातुन सर्वोत्कृष्ट तीन गणेश मंडळे निवडली होती. त्या सर्वांना मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीण उपविभागातुन प्रथम क्रमांक बीबीदारफळ ता.उत्तर सोलापूर येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, व्दितीय क्रमांक मौजे बोरामणी येथील जयलक्ष्मी तरूण मंडळ यांना व तृतीय क्रमांक मंद्रुप येथील मानाचा मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ या मंडळास दिला आहे.
मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी उपस्थित सर्वांना आगामी काळात येणारे सर्व सण उत्सव डॉल्बीमुक्त व पर्यावरण पुरक करून पारपारिक वाद्य वाजुन साजरे करावेत. डॉल्बीमुक्त केल्यामुळे आजारी व्यक्तींना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आगामी काळात येणारी विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडावी याकरीता सर्वांनी पोलीसांना सहकार्य करावे वगैरे मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना मा.श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर पोलीस ठाणे, सूत्रसंचालन श्री.समाधान कदम, सहायक पोलीस निरीक्षक व आभार प्रदर्शन श्री.मनोज अभंग, सहायक पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमा करीता गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील बहुसंख्येने उपस्थित होते…