ब्रेकिंग:-टायगर ग्रुप मधील बाबा ला फौजदार चावडी पोलिसांनी केले २ वर्षासाठी तडीपार…

आरोपी नाव केतन उर्फ बाबा नारायणदास देवी, वय-३२ वर्षे, रा. ४७९०, सिध्देश्वर हॉस्पीटल शेजारी, एस.टी. स्टॅन्ड जवळ, पुना नाका, सोलापूर याच्या विरुध्द सन २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये, सामान्य नागरीकांना दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण करणे, बेकायद्याची मंडळी जमा करुन दंगा, मारामारी करणे, महिलांची छेडछाड करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्या कडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. २५२८/२०२४ दि.०४/१०/२०२४ अन्वये, इसम नामे, केतन उर्फ बाबा नारायणदास देवी, वय-३२ वर्षे, रा. ४७९०, सिध्देश्वर हॉस्पीटल शेजारी, एस.टी. स्टॅन्ड जवळ, पुना नाका, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर इंदापूर, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.