maharashtrapoliticalsocialsolapur

गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

आमदार विजयकुमार देशमुख यांचे नागरिकांनी मानले आभार...

 

सोलापूर : प्रतिनिधी

हद्दवाढ भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

१९९२ साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण १३ गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली. त्यावेळी कच्च्या आराखड्यावर गुंठेवारी खरेदी – विक्री झाली होती. शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्याने हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे. या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर झाले.

यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, सोलापूर शहरात जेव्हा मी आयुक्त म्हणून आलो तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्यासोबत गुंठेवारीबाबत चर्चा केली आणि सोडवण्यासाठी विनंती केली. आज गुंठेवारी नियमित नोंदणी शिबिराचा शुभारंभ करताना आमदार विजय देशमुख यांनी मला सांगितलेले पहिले काम मार्गी लागल्याचा आनंद होतोय. गुंठेवारी जागा ही सर्वसामान्य गोरगरीब, श्रमिक, कामगारांची अधिक प्रमाणात आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे व सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळे गुंठेवारी नियमित करण्याचे काम सुरू झाले आहे, असेही महापालिका आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी आमदार विजय देशमुख, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख, भूमापन सोलापूर अधीक्षक घोडके, मोजणी अधीक्षक धनंजय सावंत, मनीष बिष्णूरकर, मनपा बांधकाम विभागाचे प्रभारी नीलकंठ मठपती, आनंद जोशी, तलाठी अभिषेक काळे, बसवराज इटकळे, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, श्रीनिवास करली, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, अविनाश पाटील, प्रा. नारायण बनसोडे, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, शालन शिंदे, ज्योती बमगोंडे, राजेश उबाळे, श्रीनिवास पुरुड, वैभव बरबडे, झाकीर सगरी, अमोल बिराजदार, दत्तात्रय बडगु, धोंडाप्पा वग्गे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

——————
कोट

गेल्या तीस वर्षांपासून शहरातील गुंठेवारी प्लॉट धारकांना भेडसावणारा प्रश्न सुटून आता गुंठेवारी नियमित झाल्याने गुंठेवारी धारकांना स्वतःचे हक्काच्या घर बांधकामांसाठी बांधकाम परवाना मिळणार आहे. वित्तीय संस्थेकडून व बँकेकडून गृह कर्ज सहज उपलब्ध होऊन त्यांना आपल्या शहरातच घराची स्वप्नपूर्ती करता येणार आहे. याबद्दल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचे मोठे सहकार्य मिळाले.
विजय देशमुख, आमदार, शहर उत्तर
——————-
कोट

गुंठेवारीच्या प्रश्नामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जागा खरेदी विक्री आणि बांधकाम परवानासाठी आम्हाला त्रास होत होता. हजारो नागरिकांचा हा प्रश्न आमदार विजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे सुटल्यामुळे त्यांचे आभार.
श्रीशैल सोनके नागरिक, शेळगी
———————
चौकट

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयाच्यावतीने पुढील गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिर ०९ जून रोजी बाळे येथे होणार आहे. शहरातील सर्वच हद्दवाढ भागात गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माजी नगरसेवक डॉ. किरण विजय देशमुख यांनी केले आहे.
—————–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button