india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

बंजारा समाजाच्या आरक्षणावर चर्चेसाठी सोलापूर जिल्ह्यातून उपोषणकर्ते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांचे विशेष निमंत्रण….

सोलापूर

बंजारा समाज हा भारतातील प्राचीन, परंपरागत आणि मेहनती समाज आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या या समाजाला न्याय मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा सुरू आहे.

लढ्याची पार्श्वभूमी

बंजारा समाजाला स्वतंत्र ओळख मिळावी आणि शैक्षणिक तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, या मागणीसाठी समाजाने सातत्याने आंदोलन केले आहे. अनेक राज्यांमध्ये या समाजाला OBC किंवा ST आरक्षण श्रेणीत समाविष्ट करण्याची मागणी केली गेली आहे.

महाराष्ट्रातील आंदोलन

महाराष्ट्रात बंजारा समाजाने अनेक ठिकाणी मोर्चे, उपोषणे आणि सभा घेत समाजाच्या मागण्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला. समाजाचे प्रमुख नेते आणि संघटना आरक्षणासाठी एकत्र येऊन शांततामय मार्गाने लढा देत आहेत.

प्रमुख मागण्या

1. बंजारा समाजाला स्थायीपणे OBC/NT किंवा ST आरक्षणात समाविष्ट करणे

2. शैक्षणिक आणि रोजगार क्षेत्रात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देणे

3. समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि जतन करणे

4. समाजातील युवकांसाठी शैक्षणिक योजना आणि शिष्यवृत्ती वाढवणे

या प्रमुख मागण्या बंजारा समाजाच्या आहेत.यावर चर्चा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातून एकमेव अशोक चव्हाण यांना विशेष निमंत्रण दिले आहे. आरक्षणाच्या लढाईसाठी अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. बंजारा समाजाची संस्कृती,परंपरा व आरक्षणाचे गाढे अभ्यासक म्हणून अशोक चव्हाण त्यांची विशेष ओळख आहे . समाज आणि सरकार यांमधले अशोक चव्हाण मध्यकेंद्रबिंदू असल्याने त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण समाज बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे..

आरक्षणासाठी त्यांनी चार दिवस आमरण उपोषण केले होते.अशोक चव्हाण यांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर ते बंजारा तांडा वस्ती सुधारणा योजनेचे सद्य स्थितीत अशासकीय सदस्य आहेत.या महत्वपूर्ण बैठकीसाठी राज्यभरातून समाजाचे अनेक दिग्गज मान्यवर ,आमदार, खासदार या बैठकीस उपस्थित राहणार असल्याने या बैठकीकडे महाराष्ट्रातील असंख्य समाज बांधवांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button