crimemaharashtrapoliticalsocialsolapur

“तेरे घर मैं घुस कर मारेंगे” माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याकडून वकिलास धमकी …

माजी मंत्री ढोबळे यांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

सोलापूर

यातील माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे सातत्याने यातील तक्रारदार ॲड.दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांना वारंवार शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देतायत.याबाबत तक्रारदार ॲड.दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ढोबळे यांनी त्यांच्या स्वतः च्या मोबाईल वरून यातील तक्रारदार यांना “तेरे घर मैं घुस कर मारेंगे”अश्या वारंवार धमक्या देत आहे . गणपती विसर्जन दिवशीही मोटार सायकल वर येऊन बंदुकिसह ठार मारण्याची धमकी खडतरे कुटुंबीयांना दिली.याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जात नाही. खडतरे कुटुंबियांच्या जीवितास धोका असून तक्रारदार यांनी पोलीस संरक्षण मिळण्याबाबत पोलिसांकडे विनंती केली असता अद्याप पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने ॲड.दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांनी त्यांना होणारा मनस्ताप व्यक्त केला .या प्रकरणाची नेमकी पार्श्भूमी पहायला गेली तर यातील तक्रारदार ॲड..दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांना मंगळवेढा सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय मंगळवेढा येथे चालविण्यासाठी मंजुरी आदेश देण्यासाठी लक्ष्मण ढोबळे यांनी तक्रारदार ॲड.दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले होते. पैसे घेऊनही या कामात वारंवार चाल ढकल करून हे काम मिळवू दिले नाही आणखी २ लाखाची मागणी ढोबळे यांचा कार्यकर्ता सुरेश ईश्वर कांबळे रा . मंगळवेढा यांनी सेतू सुविधा केंद्राचे पार्टनर करा मगच मी सेतू सुविधा केंद्र मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळवून देतो असे सांगितले परंतु पार्टनरशिप उद्योगास नकार देऊन मंत्री ढोबळे यांना दिलेले ५ लाख रुपये.परत मागितले.त्यातील केवळ १ लाख रुपये परत केल्याचे ॲड. खडतरे यांनी सांगितले. रक्कम मागितल्या पासून मंत्री ढोबळे यांच्या कडून खडतरे कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचे ॲड. खडतरे यांनी सांगितले.
तसेच २०१७ साली मंगळवेढ्यात मार्च / एप्रिल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली होती.त्यामध्ये हुळजंती ता.मंगळवेढा येथील जिल्हा परिषद गटामध्ये व पंचायत समिती डोंगरगाव या गटामध्ये ॲड.दत्तात्रय तात्यासाहेब खडतरे यांच्या पत्नी कविता व आई आशाबाई खडतरे यांनी अर्ज भरला होता . त्यावेळी इतर उमेदवार ही निवडणुकीस उभे होते. त्यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा { मयत तदस्थितीतील उमेदवार} होत्या.त्यावेळी निवडणुकीत माघार घेऊन अर्ज काढून घ्यावा साठी खडतरे कुटुंबीयांना दमदाटी करण्यात आली होती .
त्यावेळी आशाबाई खडतरे यांनी घाबरून अर्ज माघारी घेतला तर कविता खडतरे यांनी अर्ज मागे घेतला नाही आणि निवडणूक लढविली. त्यावेळी अनुराधा लक्ष्मण ढोबळे { सध्या मयत } यांचा पराभव झाला. माझ्या पत्नीचा बिनविरोध विजय होणार होता परंतु तुमच्या पत्नी कविता खडतरे यांनी अर्ज मागे न घेतल्याने माझ्या पत्नीचा अनुराधा चा पराभव झाला .तुमच्यामुळे माझे आर्थिक नुकसान झाले .मी तुम्हाला बघून अशी धमकी ढोबळे यांनी दिली व आजतागायत आमच्या कुटुंबीयांना सातत्याने धमकी दिली जात आहे.सलग मी २५ वर्षे आमदार १५ वर्षे मंत्री पदे भोगली आहेत .माझ्या नादाला लागल्यास तुमच्या घरावर दरोडा पडू शकतो.तुमचा अपघात होऊ शकतो. तुमच्यावर विनयभंग,बलात्कार , आमली पदार्थ तस्करी अश्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. अशी धमकी ढोबळे गेल्या सहा वर्षांपासून देतायत अशी माहिती ॲड. खडतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस आशाबाई खडतरे,कविता खडतरे यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button