
सोलापूर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे लोकहिताची कामे अडकून पडली आहेत. अधिकार्यांना जाब विचारणारे कोणीच नसल्याने जनता फारच त्रस्त झाली आहे. बाप्पा लादलेले हे प्रशासक राजवट हटू दे आणि निवडणुका होऊन जनतहित जोपासणार्या लोकांचे राज्य येवो, असे साकडे सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृहनेता, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी गणरायाला घातले.
घोंगडे वस्ती, भवानी पेठ येथील त्यांच्या सदा-ईश्वर या निवासस्थानी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले, यावेळी त्यांनी कुटुंबीयासमवेत पूजा करुन साकडे घातले. तीन वर्षांचा काळ होत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, महानगरपालिका, अनेक ठिकाणच्या बाजार समित्या यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. सरकारने कारभार हाकण्यासाठी प्रशासकांची नेमणूक केली आहे. यामुळे जनतेची कामे मोठ्या प्रमाणात अडकून पडली आहेत. आता ही कामे करा, असे सांगणारे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात फिरकेनात बाप्पा लवकरच सद्बुद्धी दे आणि निवडणुका होऊन जनतहिताचे राज्य येऊ दे, असे साकडे जनसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी गणपतीला घातले. सगळ्यात दुर्दैवी म्हणजे बाप्पा तुझ्या महाराष्ट्रामध्ये सण, उत्सव, अतिवृष्टीच्या नावाखाली विधानसभेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली. बाप्पा तुझ्या भक्तांना या गोष्टी नाहक त्रासदायक ठरत आहेत.
राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला सद्बुद्धी दे आणि वेळेत विधानसभेच्या निवडणुकाही घ्यायला भाग पाड, असेही मागणे जनसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी बाप्पांकडे घातले. पाटील कुटुंबात झालेल्या गणपती बाप्पांच्या पूजेवेळी उषादेवी पाटील, आशादेवी पाटील, सबा पाटील, विद्याश्री पाटील, विणाश्री पाटील, अक्षय पाटील, चंद्रकांत पाटील, भाजपाचे युवा नेते बिपीन पाटील, विनायक पाटील, संदीप पाटील, निंगराज पाटील, अक्षय पाटील, नरसप्पा मंदकल, विजय कोळी, प्रशांत कलशेट्टी, सिद्धारुढ गंदाळकर, वरद पाटील, ध्रुव पाटील, सान्वी पाटील, स्वेच्छा पाटील, कनिष्का पाटील, सई पाटील, कनक पाटील, ऋतिका पाटील, कशीश पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय व सुरेशअण्णा पाटील यांचा मित्र परिवार उपस्थित होता.