
सोलापूर
गणपती उत्सव व आगामी काळात येणारे धार्मिक उत्सव शांततेत पार पाडुन उत्सावाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या हद्दीतील मुळेगांव तांडा येथे चोरून चालणा-या अवैध हातभट्टी दारूच्या भट्टया उध्दवस्त करून संबंधीत इसमा विरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक व मा.श्री.संकेत देवळेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री.राहुल देशपांडे यांचे नेतृत्वाखाली आज दिनांक 09.09.2024 रोजी पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मौजे मुळेगाव तांडा येथे चोरून अवैधरित्या चालणा-या दारूच्या हातभट्टया वर छापे टाकुन कारवाई केली आहे.
चोरून अवैधरित्या चालणा-या गावंठी देशी दारूच्या हातभट्टयावर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 6 लाख 80 हजार रूपये किंमतीचे त्या मध्ये 16 हजार लिटर गुळमिश्रीत रसायन, 80 प्लॅस्टीक बॅरेल मध्ये भरून ठेवलेली गावंठी हातभट्टी दारू तयार करणे करीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून प्लॅस्टीक बॅरेल जागीच फोडुन त्यातील गुळमिश्रीत रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.
या कारवाई मध्ये 1 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 ई अन्वये गुन्हा दाखल करून संबंधीत इसमाकडुन 1600 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 80 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी यांच्या रहाते घराच्या आडोशाला चोरून अवैध गावंठी दारूच्या हातभट्टया उध्दवस्त केलेल्या ठिकाणी एकूण 3 इसमा विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्या कलम 65 फ व 83 प्रमाणे 3 गुन्हे दाखल केले असून वरील 4 गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार याचेकडुन होत आहे
यापुर्वी देखील सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणा-या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त करून कारवाई करून संबंधीत इसमा विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
यापुढेही अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणा-या इसमा बाबत गोपनियरित्या माहिती प्राप्त करून त्यांचे विरूध्द कारवाई करण्यात येणार असून त्याचा गुन्हयाचा अभिलेख पडताळुन त्यांचे विरूध्द योग्य त्या कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे.
या कारवाईत
अवैधरित्या दारूच्या हातभट्टया मधील आरोपी
1) मिथुन धेनु राठोड ,रा.मुळेगाव तांडा
2) उमेश नामदेव राठोड रा.मुळेगाव तांडा
3) रोशन किरण चव्हाण
4) नागनाथ टोपु राठोड रा.मुळेगाव तांडा
हातभट्टी दारूच्या गुन्हयातील आरोपी
1) करण प्रकाश जाधव
2) गणेश भोजु पवार रा.मुळेगाव तांडा ता.द.सोलापूर
सदरची छापा कारवाई मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका,पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील कार्यरत असलेले सपोनि/सोमनाथ कदम, मपोउपनि/नागाबाई गंपले, श्रेपोउपनि/सुनिल बनसोडे, हवेल जाधव, पोहवा/राहुल महिंद्रकर, प्रदीप बनसोडे, श्रीराम आदलिंग, पोना/नागेश कोणदे, लालसिंग राठोड, असिफ शेख, शंकर मुजगोंड, पोलीस अंमलदार किशोर सलगर, वैभव सुर्यवंशी, महिला पोलीस अंमलदार खोत, कुर्ले, भोसले व मसलखांब यांनी पार पाडली आहे.