महेश कुलकर्णी यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड ..
अजित दादांनी विश्वास ठेवून सोपवलेल्या संधीचे नक्कीच सोने करू येणाऱ्या काळात महाराष्ट्रात युवकांची आणखी ताकद वाढवू:- महेश कुलकर्णी...

सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मान्यतेने युवक चे समन्वयक महेश कुलकर्णी यांची युवक च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. पक्षासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तसेच अजित दादांसोबत एकनिष्ठ राहून तसेच अजित दादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी महेश कुलकर्णी हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या याच एकनिष्ठेचे प्रामाणिक फळ आज मिळाल्याचे युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी सांगितले.
दरम्यान त्यांच्या या निवडीबद्दल युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी नूतन युवक महाराष्ट्र सचिव महेश कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…
या सत्कार समारंभ प्रसंगी युवक महाराष्ट्र प्रदेश सचिव सनी देवकते युवक अध्यक्ष सुहास कदम , शहर उपाध्यक्ष ओंकार हजारे यांची उपस्थिती होती..
दरम्यान या निवडी बद्दल जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने, जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव यांनी तसेच सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष व ज्येथ नेते प्रांतिक पदाधिकारी यांनी महेश कुलकर्णी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी व अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी ही निवड केल्याचे युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगितले.
अजित दादांनी विश्वास ठेवून सोपवलेल्या संधीचे नक्कीच सोने करू येणाऱ्या काळात महाराष्ट्रात युवकांची आणखी ताकद वाढवू असे प्रतिपादन नूतन युवक महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी केले…