सोलापूर तालुका पोलिसांकडून आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस पाटील यांची महत्वपूर्ण बैठक ….

दिनांक 07.02.2026 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीचे मतदान व दिनांक 09.02.2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
त्या अनुषंगाने दिनांक 03.02.2026 रोजी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या अंतर्गत गावातील पोलीस पाटील यांची सोलापूर तालुका, पोलीस ठाणे येथे बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकी करीता एकूण 37 पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकी करीता उपस्थित असलेल्या पोलीस पाटील यांना सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.राहुल देशपांडे यांनी मार्गदर्शन करून मतदान व मतमोजणीच्या वेळी पोलीस पाटील यांनी करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत.

त्यामध्ये मतदान प्रतिनिधी हे बुथ मधुन वारंवार आत बाहेर करणार नाहीत, पोलीस पाटील हे मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व घटनाचे व्हिडीओ शुटींग करतील, मतदानाचे दिवशी घडलेल्या महत्वाचे घटनाची माहिती संबंधीत पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार यांना देतील, सर्व पोलीस पाटील यांनी मतदानाचे दिवशी सतर्क राहतील, मतदान केंद्र परिसरात विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी वगैरे सूचना दिल्या आहेत.

ही बैठक अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, .प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर, .राहुल आत्राम, परिविक्षावीन सहायक पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे.

सदर बैठकी करीता राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे, श्री.सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार उपस्थित होते.



