छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर संभाजी आरमार संघटनेची महत्वपूर्ण बैठक जल्लोषात संपन्न.

सोलापूर
19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती साजरी होणार आहे. संभाजी आरमार दरवर्षी मोठया थाटात जयंती वेगवेगळ्या उपक्रमानी साजरी करत असते. यंदाही 19 फेब्रुवारी रोजी शाही पालखी सोहळा आयोजित केला आहे. याच्या नियोजनाची बैठक डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच पार पडली. माजी उपमहापौर नानासाहेब काळे, नगरसेवक संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे,इन न्यूज चॅनलचे संपादक समाधान वाघमोडे,उद्योजक मनीष सुरवसे, कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड, आप्पासाहेब सावंत आदींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पूजनाने बैठकीची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष पदी जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बरडे, कृष्णा सुरवसे यांच्या निवडीबद्दल यथोचित सत्कार देखील करण्यात आला. संभाजी आरमार शाही पालखी सोहळा प्रमुखपदी अर्जुन शिवसिंगवाले, सहप्रमुख पदी अँड. रमाकांत बापट यांची निवड करण्यात आली. संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी (तात्या) वाघमोडे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडून आले आहेत. या निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा फेटा बांधून मोत्याची माळ घालून सत्कार करण्यात आला. संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाचे उद्धारकर्ते असून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत. महिला, शेतकरी, धर्म, अर्थ, संरक्षण आदी सर्वच क्षेत्रात शिवरायांनी केलेले काम अनमोल आहे.

त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी माणसाने शिवरायांची जयंती जल्लोषात साजरी केली पाहिजे असे आवाहन केले. याप्रसंगी नगरसेवक शिवाजी वाघमोडे, उत्तरा बरडे, गुरुनाथ निंबाळे, नेताजी घोडके यांची समायोचित भाषणे झाली. संभाजी आरमारचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक तर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संभाजी आरमार प्रदेश संघटक प्रकाश डांगे , जिल्हाप्रमुख अनंतराव निळे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हाप्रमुख प्रमोद जगताप, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, महिला जिल्हा संघटक ॲड. गीता पवार, शहर प्रमुख उमा राजपूत, रेखा वनखडे, दिव्यांग प्रमुख वासुदेव होनकोंबडे, राज जगताप, सुधाकर करमकोट, मल्लिकार्जुन परळकर, मल्लिकार्जुन पोतदार, द्वारकेश बबलादीकर, यांच्यासह संभाजी आरमार चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



