पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घेण्यासाठी मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांचा खटाटोप …
सुखदेव पाटील यांच्यासह त्यांच्या इतर साथी दारांवर तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर कुटुंबासमवेत आत्मदहन करणार :- बापू रणदिवे { पीडित तक्रारदार}...

सोलापूर
शुक्रवारी गाडीची चावी न दिल्याने उत्तर चे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून बापूराव रणदिवे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली होती. याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
या घटनेचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसारित होताच मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी बापूराव रणदिवे यांनी त्यांच्या बाबत दिलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून पदाचा गैरवापर करून रणदिवे यांच्या नाते वाईकांकडून दबाव बापूराव यांच्यावर दबाव आणतायत मात्र कुठलीही परिस्थितीत आपण तक्रार मागे न घेण्याचा निर्णय बापूराव रणदिवे यांनी घेतला आहे.
आपल्याला न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा बापूराव रणदिवे यांनी दिला आहे. या प्रकरणा बाबत लवकरच जिल्हाधिकारी व
पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे ही रणदिवे म्हणाले ..
याबाबत तहसीलदार निलेश पाटील यांच्याकडे माध्यमांनी चौकशी केली असता तहसीलदार निलेश पाटील यांनी ही या प्रकरणात बोलायचे टाळले आणि सारवा – सारव केली. आता या प्रकरणात बापूराव रणदिवे यांना न्याय मिळतो का ?…मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दखल होणार का ?. हे पाहणे ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे…
सोलापूरच्या पुण्यनगरीत महा कल्याणकारी अतिरूद्र स्वाहाकाराचे आयोजन…