maharashtrapoliticalsocialsolapur

अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना हयांच्या संयुक्त विद्यमानाने स्वछता अभियान…

सोलापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना शंभर दिवस उद्धीष्ठ पूर्ती बाबत सात सूत्री कार्यक्रम दिला होता, त्यांअनुषगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हयांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांनी स्वच्छता मोहीम ही केवळ अभियान प्रशासकीय न ठेवता आपल्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव धान्य दुकानदारांना देखील सदर मोहीमतेत सहभागी होण्यास आवाहन केले असता,शनिवार रोजी सकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना हयांच्या संयुक्त विद्यमानाने स्वछता अभियान राबविण्यात आले,
ह्यावेळी रेशन दुकानदार ही स्वच्छता मोहिमेत स्फुर्तीने सहभागी झाले.

 

अन्नधान्य वितरण कार्यालयातील साफसफाई,रेकॉर्ड मेन्टन सह सोबतच आजूबाजूच्या परिसरात शोभेची रोपेही लावण्यात आली त्यामुळे कार्यालयात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणी निकाली काढणे,अन्न दिन सप्ताह, लाभार्थीचे ई-के वाय सी,आधार व मोबाईल सिडिंग, सोप्या पद्धतीने ऑनलाईन नवीन व दुबार ई-शिधापत्रिका मिळविणे, स्वच्छ धान्य लाभार्थीना मिळावे ह्याकरता जनजागृती करण्यात आले तसेच अन्न धान्य वितरण कार्यालय अंतर्गत असलेल्या परिमंडळ कार्यालयात ही आलेल्या नागरिकांची कामे वेळेत व गतीने होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ही मोहीम प्रशासकीय न ठेवता आपल्या कार्यक्षेत्रातील परिमंडळ कार्यालय व रेशन दुकानातही अश्याच पद्धतीने स्वच्छता ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व दुकानदारांना ही आवाहन केले.
ह्यावेळी नेहमीच आपल्या प्रशासकीय योजनेमध्ये यशस्वी,प्रभावी व आपल्या हटके कार्य पद्धती मुळे सतत अग्रेसर असणारे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, लेखापाल वैभव ठोकळ, रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, पंच कमिटी सदस्य शिवशंकर कोरे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश आसादे, अ झोन अध्यक्ष अभिजित सडडो,ब झोन अध्यक्ष बसवराज बिराजदार, सचिव राहुल पवार, जिल्हा सचिव राज कमटम, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर सह बहुसंख्य शासकीय कर्मचारी व रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button