
मोहोळ पोलीस ठाणे हददीमध्ये वडवळ, शिरापुर, हिवरे, मोहोळ शहर, मलिकपेठ या ठिकाणी घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे मोहोळ पोलीस ठाणेस दाखल होते. सदर घरफोडी, जबरी चोरी उघडकीस आणणेकरीता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो सोलापूर विभाग संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत मोहोळ पोलीस ठाणे यांनी वेळोवेळी मोहोळ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेस सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे मोहोळ पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार कसोशीने प्रयत्न करीत होते. त्यामध्ये रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रीक विश्लेषनाचे आधारे तपास करणे, बार्शी, कामती, मंगळवेढा मोहोळ, अकलुज, सोलापुर शहर तसेच महाराष्ट्रातील व परराज्यातील गुन्हेगारांचा कार्य पध्दतीचा अभ्यास केला होता.
दि.०६/०७/२०२४ रोजी मोहोळ पोलीस ठाणे हददीत मौजे शिरापुर येथील फिर्यादी अनिल आबाजी पाटील यांचे राहते घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून कपाट तोडुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाले बाबत अज्ञात आरोपीविरुध्द मोहोळ पोलीस ठाणे गु.र.नं. ४५७/२०२४ १ भा. न्या.सं.३०५ (A), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास करून संशयिताची नावे मिळवुन त्यापैकी एक संशयित इसमनामे अक्षय उर्फ थावर मैदान भोसले रा. कासारी ता. आष्टी जि. बिड यास ताब्यात घेवुन त्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देवुन मोहोळ पोलीस ठाणे हददीतील मलिकपेठ व वडवळ येथे घरफोडी केल्याची कबुली दिली…
आरोपी नाव अक्षय उर्फ थावर मैदान भोसले वय २२ रा. कासारी ता. आष्टी जि. बीड याला दि.१३/०८/२०२४ रोजी अटक करून त्याचेकडुन १ लाख ८० रूपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
➤ दि.१३/०८/२०२४ रोजी मोहोळ पोलीस ठाणे दाखल १९ गुन्हयातील फरारी आरोपीनामे आकाश उर्फ पपन्या संभाजी चव्हाण वय ३४ रा. बेंबळी ता. धाराशिव जि. धाराशिव यास धाराशिव येथुन ताब्यात घेवुन त्याला मोहोळ पोलीस ठाणे गु.र.नं. १०२/२०२४ भादवी ३७९,३४ प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने मोहोळ पोलीस ठाणे हददीतील हिवरे पाटी येथील एका वृध्द महीलेस मारहाण करून तिचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने घेवुन गेल्याची कबुली दिली.
आरोपीनामे आकाश उर्फ पपन्या संभाजी चव्हाण वय ३४ रा. बेंबळी ता. धाराशिव जि. धाराशिव याला दि. १३/०८/२०२४ रोजी अटक करून त्याचेकडुन ३० हजार रूपये किंमतीचे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
दि.०३/०७/२०२४ रोजी मोहोळ शहरातील एस.टी. स्टॅन्ड शेजारी महीलानामे वच्छला काशिनाथ जवंजाळ रा. वाफळे ता. मोहोळ ही कामानिमित्त येवुन पंढरपुर रोड ब्रिजच्या खाली थांबली असता तिच्या जवळ एक दोन इसम येवुन सोनेरी रंगाचा बिस्किटाचा धातु पायात टाकुन हा तुमचा आहे असे विचारून तो धातु फिर्यादीने माझा नाही असे सांगितल्याने हा धातु आपण तिघे वाटुन घेवु असे सांगुन फिर्यादीचे गळयातील व कानातील सोन्याचे दागिने घेवुन त्या ऐवजी बनावट सोन्याचे बिस्किट फिर्यादीस देवुन निघुन गेला याबाबत मोहोळ पोलीस ठाणेस गु.र.नं.४५३/२०२४ भा.न्या.सं. ३१६(२),३१८(४),३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास करून संशयिताची नावे मिळवुन त्यापैकी एक संशयित इसमनामे प्रतिक नामदेव शिंदे वय २८ रा. पानगाव ता. माण जि. सातारा यास ताब्यात घेवुन त्याकडे विश्वासात घेवुन तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली…
> आरोपीनामे प्रतिक नामदेव शिंदे वय २८ रा. पानगाव ता. माण जि. सातारा यास नमुद गुन्हयात अटक करून त्याचेकडुन ३० हजार रूपये किंमतीचे ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त केले.
वरील घरफोडी, जबरी चोरी व फसवणुक अश्या ०५ गुन्हयातील वेगवेगळया ०३ आरोपीकडुन एकुण २ लाख ४० हजार रूपयांचा किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच सदर आरोपींकडे अजुन तपास चालु असुन आणखी काही गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे.
सदरची कामगिरी. मा. पोलीस अधीक्षक साो श्री अतुल कुलकर्णी, सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, सोलापुर विभाग, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत मोहोळ पोलीस ठाणे, पोसई / प्रविण साने, पोसई / गजानन कर्णेवाड, पोहेकॉ दयानंद हेंबाडे, सचिन माने, राहुल कोरे, रणजित भोसले, पोना/चंद्रकांत ढवळे, पोकॉ सिध्दनाथ मोरे, अजित मिसाळ, अमोल जगताप, सुनिल पवार, स्वप्निल कुबेर, संदिप सावंत, सायबर पोलीस ठाणे कडील पोहेकॉ युसुफ पठाण यांनी गुन्हयातील आरोपी पकडुन कौशल्यपुर्ण तपास करून गुन्हयातील गेला माल हस्तगत करण्यास व तपासकामी मदत केली आहे….