crimeindia- worldmaharashtrasocialsolapur

उच्च शिक्षणासाठी मुलींना फी माफीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केली कुलगुरूंशी चर्चा…

जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन कुलगुरू डॉ. महानवर यांना दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...

सोलापूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता फी माफीची घोषणा केली आणि तात्काळ शासन निर्णय केला . त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी विद्यापीठात भेट घेतली . राज्य शासनाने घेतलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता फी माफीचा जो निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात अनेक कॉलेज या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना दिसत नाहीत अनेक मुलींच्या तक्रारी येत असून या संदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती नसल्याकारणाने पालकांची व विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.

तरी विद्यापीठाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता प्रभावी उपाययोजना करावी सर्वांना योजनांची लाभ आणि माहिती होण्याकरता ज्या पद्धतीने उच्च शिक्षण मंत्रालयाने टोल फ्री क्रमांक तक्रारीकरिता उपलब्ध केला आहे त्याच पद्धतीने सोलापूर विद्यापीठाने देखील तशा पद्धतीची टोल फ्री क्रमांक जाहीर करून संबंधित जिल्ह्यातील मुलींच्या व त्यांच्या पालकांच्या तक्रारी नोंदवून संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या कॉलेजवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी केली. त्यावर कुलगुरूंनी शासन निर्णयामध्ये अजून स्पष्टता येण आवश्यक आहे येणाऱ्या काळामध्ये सुलभता यावी योजनेचा फायदा सर्व सामान्य मुला- मुलींना व्हावा याकरता विद्यापीठाने शासनाकडे पत्र पाठवले आहे त्या अनुषंगाने लवकरच त्यामध्ये सुलभता येईल. असे मत व्यक्त केले.याप्रसंगी कुलगुरूंचे भरदरी फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा देऊन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी विशेष सन्मान केला…

या सत्कार प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, वरिष्ठ अधिकारी अनंत पवार, सोमनाथ सोनकांबळे, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, फर्नांडिस सर, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे , कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांची उपस्थिती होती….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button