Crime speed news:- शहर गुन्हे शाखेकडून ०४ चोरीचे गुन्हे उघड….
दिनांक २६/०६/२०२४ रोजी रोजी रात्री ११.३० वा. चे सुमारास इसम नामे रूपनरदीन मुहमदसिध्दी मुहमद, वय-३८ वर्षे, रा. अशोक नगर, श्रीग्रास जि, दुमकुर, कर्नाटक हे त्याचे मालकीचे मालट्रक क्र. के.ए.०६ ए.सी. १४७० मधुन देवरहिपर्णी, गुलबर्गा, कर्नाटक येथुन तुरीचे १०० किलो वजनाचे एकुण २२५ पोते घेवुन मार्केट यार्ड, सोलापूर येथे विक्रीसाठी आले होते. सोलापूर येथे आलेनंतर, सोलापूर-हैद्राबाद रोडवरील जनावराचे बाजारा जवळील रोडलगत मालट्रक थांबवुन ते गाडीतच झोपी गेले. मात्र, सकाळी ते झोपेतुन उठले व मालट्रकची पाहणी केली असता, मालट्रकची ताडपत्री फाटलेली व त्यामधील १०० किलो वजनाचे ४ तुरीचे पोती चोरी झाल्याचे दिसुन आल्याने, त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणेस तुर धान्य पोती चोरी झाले बाबत तक्रार दिल्याने, याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुरनं-३६५/२०२४ भादंवि-३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
त्या अनुषंगाने, शहर गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोलापूर मार्केट यार्ड मधील फिरस्ता व रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल ऊर्फ मोठा काल्या चौगुले यांचे मौलाना आझाद चौक, नई जिंदगी येथील राहते घराचे पत्रा शेड मध्ये तुरीचे पोती ठेवले आहेत. त्यानुसार, स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे पथकाने, मिळालेल्या बातमी प्रमाणे, पंचासह, इसम नागे- अनिल ऊर्फ मोठा काल्या राजू चौगुले, वय-३२ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. मार्केट यार्ड, सोलापूर, सद्या मौलाना आझाद चौक, नई जिदंगी, सोलापूर, याचे घराची झडती घेतली असता, घरामध्ये ०४ तुरीचे पोती मिळून आली. त्याबाबत त्याचेकडे कौशल्याने विचारपूस केली असता, त्याने व त्याचे आणखी ४ साथीदार यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने, सदर तुरीचे ०४ पोती जप्त करणेत आले. त्यांचे इतर साथीदार पैकी १) विराज हुसेनी कांबळे, वय-२५ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. १३६, कडबा बाजार जवळ, रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, सोलापूर, २) राकेश मारूती बनसोडे, यय-२६ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. भारत नगर, कुमठा नाका, सोलापूर ३) प्रज्वल नाकेश होवाळे ऊर्फ मिष्ठा, वय-२५ वर्षे, रा. भारत नगर, कुमठा नाका, सोलापूर यांना ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. तसेच आरोपी नामे अनिल ऊर्फ मोठा काल्या राजू चौगुले यांचे साथीदार यांनी चोरी केलेल्या २ मोटार सायकली देखील त्याचे कब्जात मिळुन आल्याने, खालील प्रमाणे मोटार सायकल चोरीचे ०२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.