बालवयात संस्कारीत विद्यार्थी घडवणे खरोखर कौतुकास्पद : पोलीस उपअधिक्षक ग्रामीण विजया लक्ष्मी कुर्री….
सोलापूर
विद्यार्थीच्या व्यक्तीमत्व विकासात वाढ व्हावी हि संकल्पना चैतन्य टेक्नो स्कूल मध्ये विद्यार्थी मंडळाची स्थापना पोलीस उपअधिक्षक ग्रामीण विजया लक्ष्मी कुर्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .
मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि बालवयातूनच मुलाना क्रिडा, संस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक ग्रुप जबाबदारी लिडर शिप चे नेतृत्व करण्याची जबाबदारीची जाणीव करून देत नेतृत्व करण्याची संधी चैतन्य टेक्नो हि संस्था शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे आम्हा सोलापूर करांना अभिमानाची गोष्ट आहे..
या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य पी सौजन्या यांनी विजया लक्ष्मी कुर्री यांच्या सत्कार पुप्पगुच्छ मानपत्र देवून करण्यात आला. प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रविन्द्र नाशिककर यांचा सत्कार शाखा व्यवस्थापक रुपाली चौधरी यांनी केला व कार्यक्रमाची सुरवात शालेय परिपाठ ने करण्यात आला विद्यार्थी मंडळा मध्ये स्कूल हेड बॉय पदासाठी शिवम सिंग तर हेड गर्ल पदासाठी कैफिया शेख यांची निवड करण्यात आली त्यांना मानचिन्ह मा प्रमुख पाहुणे विजया लक्ष्मी कुर्री यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. सुत्रसंचलन रुपाली कांबळे यांनी केले या प्रसंगी मा प्राचार्या पी सौजन्या , शाखा व्यवस्थापक रूपाली चौधरी विस्तार अधिकारी आदिनारायण पडाल तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आभार प्रदर्शन हेड गर्ल कैफिया शेख हिने केले.