india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व मोबाईलच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन

सोलापूर :

 

 

श्री बसवेश्वर मराठी विद्यालय, विडी घरकुल, सोलापूर येथे शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत सोलापूर विद्यापीठाच्या वतीने व क्विक हिल फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मोबाईलचा योग्य व सुरक्षित वापर, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे विविध दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते सातवीचे सर्व शिक्षक तसेच विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका लंगोटे  यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रीमती चिप्पा मॅडम यांनी उपस्थितांचे स्वागत करून पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी जामदार  यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा उपक्रम आदरणीय मार्गदर्शिका  मारपल्ली  यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्याख्यानादरम्यान मनमोकळेपणाने विविध शंका विचारल्या. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबाबत आपला सकारात्मक फीडबॅकही दिला.

सायबर जगतात वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button