maharashtrapoliticalsocialsolapur

नरेंद्र‎ मोदींच्या‎ वाढदिवसानिमित्त‎ ‘ईच्छा‎ भगवंताची परिवार’चा सेवा संकल्प; आरोग्य शिबिरातून‎ नागरिकांची‎ आरोग्य‎ तपासणी

तज्ज्ञ‎ डॉक्टरांकडून नागरिकांना तपासणी व‎ मार्गदर्शन; सेवा संकल्प‎ सोहळ्यात‎ आरोग्यविषयक‎ उपक्रमाला‎ उत्स्फूर्त‎ प्रतिसाद

 

 

सोलापूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त‎ १७‎ सप्टेंबर‎ ते १७ ऑक्टोबरदरम्यान‎ राबविण्यात येत‎ असलेल्या ‘सेवा‎ संकल्प’‎ सोहळ्याच्या‎ निमित्त‎ सेटलमेंट परिसरातील ईच्छा‎ भगवंताची नवरात्र‎ महोत्सव‎ मंडळ‎ संचालित‎ ईच्छा‎ भगवंताची गणेशोत्सव मंडळ आणि ‘ईच्छा‎ भगवंताची‎ परिवार’‎ यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे‎ आयोजन करण्यात‎ आले.‎ शेठ गोविंदजी रावजी‎ आयुर्वेद‎ महाविद्यालय,‎ सोलापूर‎ येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या‎ उपस्थितीत हे‎ शिबिर‎ उत्साहात‎ संपन्न‎ झाले.‎ नागरिकांच्या‎ आरोग्याची वेळेवर तपासणी व्हावी, आजारांचे प्राथमिक‎ स्तरावर‎ निदान‎ व्हावे‎ आणि सर्वसामान्यांना तज्ज्ञ‎ डॉक्टरांचे मार्गदर्शन‎ सहज‎ उपलब्ध‎ व्हावे,‎ या‎ उद्देशाने‎ या‎ शिबिराचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ स्त्रीरोग‎ तज्ज्ञ डॉ. पौर्णिमा‎ हिरेमठ यांनी महिलांची तपासणी‎ करून आवश्यक‎ आरोग्यविषयक‎ मार्गदर्शन‎ केले. नेत्ररोग‎ तज्ज्ञ डॉ.‎ सतीश‎ आदीमनी. यांनी‎ डोळ्यांशी‎ संबंधित‎ विविध‎ आजारांची तपासणी‎ केली.‎ तसेच जनरल फिजिशियन डॉ.‎ कुशल जैन यांनी नागरिकांची‎ सर्वसाधारण आरोग्य तपासणी‎ करून आवश्यक मार्गदर्शन केले.‎ यावेळी भाजपा‎ नगरसेवक किसन भाऊ‎ जाधव‎ म्हणाले, “पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी‎ यांनी देशाच्या विकासासोबतच ‘सेवा‎ संकल्प’‎ ही‎ कार्यसंस्कृती‎ समाजासमोर ठेवली आहे.

 

त्यांच्या वाढदिवसानिमित्त‎ महिनाभर सुरू असलेल्या‎ सेवा संकल्प सोहळ्यात‎ सहभागी होत‎ नागरिकांच्या‎ आरोग्यासाठी‎ हा‎ उपक्रम‎ राबविण्यात‎ आला.‎ समाजातील‎ प्रत्येक‎ घटकापर्यंत सेवा‎ पोहोचविणे‎ हीच‎ खरी लोकसेवा आहे.‎ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,‎ प्रदेशाध्यक्ष‎ रवींद्र‎ चव्हाण,‎ पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख,‎ सुभाष देशमुख,‎ सचिन कल्याणशेट्टी‎ तसेच सोलापूर‎ शहर‎ मध्यचे आमदार देवेंद्र कोठे,‎ भाजपा शहराध्यक्षा‎ रोहिणी‎ ताई‎ तडवळकर,नगरसेविका‎  अंबिकाताई नागेश‎ अण्णा गायकवाड,नगरसेविका‎  चैत्रालीताई शिवराज‎ गायकवाड‎ यांच्या‎ नेतृत्वाखाली‎ भाजपच्या‎ माध्यमातून‎ सेवा व जनकल्याणाचे‎ विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

 

मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष‎ व‎ आधारस्तंभ‎ लक्ष्मण‎ मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगरसेवक‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड,‎ ॲड. अनिल दादा‎ जाधव‎ आणि युवा नेते चेतन‎ नागेश अण्णा गायकवाड यांच्या‎ पुढाकारातून हा‎ उपक्रम‎ यशस्वी‎ झाला. यावेळी‎ कैकाडी‎ समाजाचे‎ सचिव सुरजकुमार‎ संभाजी‎ गायकवाड रत्नापूरकर, मंडळाचे उत्सव अध्यक्ष उत्कर्ष विनोद‎ गायकवाड‎ तसेच‎ मंडळाचे‎ सर्व‎ पदाधिकारी, कार्यकर्ते‎ व सदस्य‎ उपस्थित होते.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button