crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

दत्तकला शिक्षण संस्थेची तीन विभागांकडून चौकशी ! रामदास झोळ फरार ; अटकपूर्व जामीन फेटाळला…

 

माया झोळसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

 

 

सोलापूर (प्रतिनिधी)

 

मनोहर भोसले याच्याशी कथित आर्थिक हितसंबंध असल्याच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ आणि सचिव माया झोळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संस्थेची धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि आयकर विभाग या तीन यंत्रणांकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

 

 

 

माया झोळ यांना अटक झाली असून रामदास झोळ अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, रामदास झोळ यांचा अटकपूर्व जामीन बार्शी न्यायालयाने फेटाळला आहे.या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांनाही अटक झाली होती.

 

 

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने माया झोळ, राजेंद्र हुंबे आणि लक्ष्मीकांत लिगाडे या तिघांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अंजना कृष्णा यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button