india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून‎ आ.अनिकेतभाई तटकरे‎ यांचा सोलापुरी‎ पद्धतीने सन्मान

 

 

सोलापूर

 

विधान परिषदेवर नुकतीच बिनविरोध निवड‎ झाल्याबद्दल राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीचे‎ (अजित‎ पवार‎ गट)‎ आमदार अनिकेतभाई सुनील तटकरे‎ यांचा ‘ईच्छा भगवंताची’ परिवाराच्या वतीने‎ सोलापुरी‎ पद्धतीने सन्मान करण्यात आला.‎ सोलापूर‎ महानगरपालिकेच्या प्रभाग‎ क्रमांक‎ २२ चे‎ भाजप‎ नगरसेवक किसन जाधव‎ यांनी रायगड येथील‎ गीता‎ बाग, सुतारवाडी‎ येथील तटकरे यांच्या‎ निवासस्थानी जाऊन‎ हा सत्कार केला. यावेळी‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ अनिकेतभाई‎ तटकरे यांना ‘अस्सल‎ सोलापुरी आमदार’ असा‎ उल्लेख‎ असलेला‎ फेटा बांधून‎ भला‎ मोठा‎ पुष्पहार घातला. तसेच अस्सल प्रसिद्ध‎ सोलापुरी चादर‎ भेट‎ देण्यात‎ आली.

 

 

 

विशेष आकर्षण‎ ठरलेल्या‎ या‎ सोलापुरी‎ चादरीवर राज्याचे मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ हे विधान परिषद आमदार‎ अनिकेतभाई‎ तटकरे‎ यांना‎ पेढा‎ भरवत‎ असतानाचा,‎ तसेच खासदार‎ सुनील तटकरे‎ आणि‎ महिला‎ व बालकल्याण‎ मंत्री‎ आदिती तटकरे‎ यांचा एकत्रित फोटो‎ प्रतिमा स्वरूपात‎ विणण्यात‎ आला होता.‎ ही आगळीवेगळी‎ प्रतिमा‎ पाहून आमदार‎ अनिकेतभाई‎ तटकरे भारावून गेले.‎ सोलापुरी‎ चादरीला जगभरात वेगळी‎ ओळख आहे.‎ अशा‎ जगप्रसिद्ध‎ सोलापुरी चादरीवर आपल्या कुटुंबाचा‎ आणि‎ मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस‎ यांच्यासोबतचा हा विशेष‎ क्षण‎ प्रतिमेच्या माध्यमातून‎ जतन करून‎ भेट दिल्याबद्दल किसन जाधव यांचे‎ त्यांनी‎ आभार‎ मानले.‎ सोलापूरच्या कलेची आणि‎ सोलापुरी‎ चादरीची‎ ओळख अशा‎ पद्धतीने जपल्याबद्दल त्यांनी कौतुकही केले.‎ यावेळी‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते‎ तथा‎ खासदार सुनील तटकरे‎ यांचाही‎ शाल,‎ फेटा व‎ पुष्पगुच्छ देऊन‎ किसन‎ जाधव‎ यांनी सत्कार केला. किसन जाधव‎ हे‎ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‎ सक्रिय होते.‎ अलीकडील निवडणुकीत त्यांनी भाजपकडून निवडणूक‎ लढवून नगरसेवक‎ म्हणून विजय‎ मिळविला.‎ मात्र पक्ष‎ बदलला‎ असला‎ तरी‎ तटकरे परिवाराशी‎ असलेले जुने ऋणानुबंध‎ त्यांनी‎ कायम जपले‎ आहेत.‎

 

 

 

त्यामुळे हा‎ सत्कार‎ कोणत्याही‎ पक्षीय‎ राजकारणापलीकडे कौटुंबिक‎ जिव्हाळा‎ आणि‎ जुन्या ऋणानुबंधांचा‎ सन्मान‎ म्हणून‎ करण्यात‎ आला.‎ याप्रसंगी‎ युवा‎ नेते चेतन नागेश‎ अण्णा‎ गायकवाड, माणिक कांबळे,‎ अजय‎ बिरवटकर, हुलगप्पा शासम, पवन‎ बेरे, वैभव प्रचंडे, वसीम रंगरेज‎ आदींची‎ उपस्थिती होती.‎ यावेळी‎ किसन जाधव‎ यांनी‎ खासदार‎ सुनील तटकरे‎ यांना‎ सोलापूर शहराच्या विकासासंदर्भातील‎ काही‎ निवेदनेही दिली. महायुतीच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास होत‎ असून,‎ आगामी काळातही सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक ते‎ सहकार्य करण्याची भूमिका‎ राहील, असे खासदार‎ सुनील तटकरे‎ यांनी यावेळी सांगितले.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button