india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

फिटरियम जिम येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

सोलापूर

देशाच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंगळवार पेठ, सोलापूर येथील फिटरियम जिम 816 च्या वतीने शिवशंभो ब्लड बँक, मोहोळ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल १२० युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

 

 

 

यावेळी रोहन गायकवाड, ad रोहित गायकवाड, ad लौकिक इंगळे, गणेश गायकवाड, विनीत ॲनागुंडे, विवेक माळवदकर, आशीर्वाद तळभंडारे, नीरज पवार, मोहित मोरे, ऋषिकेश सैधनवर, परमजीत कदम, शुभम भरकाल, विकास माळवदकर, अमित कुलकर्णी, प्रणव अडकी आणि ओम मोडके यांच्यासह अनेक युवकांनी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

शिबिराचे प्रमुख संयोजक जिमचे संचालक रोहित गायकवाड यांनी सांगितले की, फिटरियम जिमच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या सामाजिक संकल्पना राबविण्यात येतात. यावर्षी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला असून युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला.

 

 

 

रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याची भावना व्यक्त करत उपस्थितांनी नियमित रक्तदानाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करत कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button