बी टू चा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील बी टू चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर सेंटर यांच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर सेंटरतर्फे सन्मानित करण्यात आले.

या सत्काराप्रसंगी असोसिएशनचे माजी ज्येष्ठ चेअरमन बिपिनभाई पटेल, मल्लिकार्जुन कावळे, अशोक गांधी, चेअरमन मनोज म्हेत्रस, व्हाईस चेअरमन हनुमंत कुलकर्णी, सचिव यशवंत पाथरूट, खजिनदार सलीम दर्जी, संतोष कलगुडगी, अजय अन्नलदास, युवराज चुंबळकर, राजेश देशमुख, दत्ता मुळे, गोरख देशमुख, अमर बिराजदार, भगवान जाधव, बाबुभाई सोनी, रामभाऊ दुधाळ, उमेश गायकवाड, विनोद बोरकर, विजय बेंद्रे, विश्वनाथ पवार, अशोक तंबोळू आदी उपस्थित होते.




