“औषधौपचाराला पौष्टिक आहाराची साथ, क्षयरुग्णांना देऊया माणुसकीचा हात”

सोलापूर
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री टीबी मूक्त भारत अभियानामध्ये शहर क्षयरोग केंद्र मदर तेरेसा पॉलीक्लिनिक सोलापूर महानगरपालिका येथे *लायन्स क्लब यांच्या तर्फे उपचाराधीन क्षयरुग्णांना ५० पोषण आहार किट (Food basket)वाटप करण्यात आले. या अभियानामध्ये जोखीमग्रस्त लोकसंख्येची मोफत छातीचा एक्स-रे, थुंकी नमुना तपासणीनंतर निदान झालेल्या क्षयरुग्णांना मोफत औषधोपचाराबरोबरच उच्च प्रथिनयुक्त(High Protein )आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. सेंट्रल टी बी डिव्हिजन ,नवी दिल्ली यांनी आवश्यक असणाऱ्या दैनंदिन उष्मांकाचा विचार करून मटकी , हिरवा मूग , सोयाबीन , शेंगादाणे , गूळ ,हिरवा वाटाणा , चना ,खजूर इत्यादीचा समावेश पोषण आहार किट (food basket ) मध्ये केला आहे.
निक्षय मित्र म्हणजे नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती ,दानशूर व्यक्ती, समाजसेवक , उद्योजक,कार्पोरेट संस्था सामाजिक संस्था ,औद्योगिक संस्था ,स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधी यांनी क्षयरुग्णांना पोषक आहारासाठी मदत करणे होय* अशा प्रकारे सोलापूर शहरवासीयांनी निक्षय मित्र बनावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे मा.आयुक्त डॉ. सचिन ओंबासे,मा.अतिरिक्त आयुक्त(आरोग्य )मा.वीणा पवार,मा.आरोग्याधिकारी डॉ. राखी माने,मा.शहर क्षयरोग अधिकारी डॉ.प्रसाद कुमार यांनी केले आहे इच्छुकांनी अधिक माहितीसाठी शहर क्षयरोग केंद्र, डफरीन हॉस्पिटल कंपाउंड ,मदर तेरेसा पॉलिक्लिनिक, होम मैदान समोर सोलापूर येथे संपर्क साधावा.
या मदतीचा फायदा असा की क्षयरुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून लवकर बरे होण्यास मदत होते, औषधाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होतात, टीबी मुक्त करण्याच्या राष्ट्रीय संकल्पनेला गती मिळून सोलापूर शहर क्षयमुक्तीकडे लोकसहभागातून वाटचाल करेल.
या कार्यक्रमाच्या वेळी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद कुमार,लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेंद्र शहा, रिजन चेअरमन महेश नळे, राजश्री जोशी,महानंदा पाटील, अँड.एम के पाटील, श्री.मंजुनाथ दर्गो पाटील,श्री. केदार स्वन्ने, डॉ.अभिजीत जोशी, श्री.गंगाप्रसाद बंडेवार ,श्री.स्वामीनाथ कलशेट्टी, एनटीईपी कर्मचारी उपस्थित होते.



