india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

भारतीय जनता युवा मोर्चाला महापालिकेत संधी देण्याची मागणी

भाजपा शहराध्यक्षांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे निवेदन

 

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना महापालिकेत योग्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे केली.

 

 

 

या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने नेहमीच युवा मोर्चाच्या माध्यमातून नव्या नेतृत्वाला संधी देण्याची परंपरा जपली आहे. आजचा काळ नव्या पिढीच्या नेतृत्वाचा असून युवकांना जबाबदारी देणे ही काळाची गरज आहे. भारतीय जनता युवा मोर्चा हा पक्षाचा सक्रिय व समर्पित घटक असून पक्षाच्या प्रत्येक निवडणुकीत आंदोलनात व संघटनात्मक उपक्रमात युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. मात्र महापालिका निवडणुकीत युवा मोर्चाच्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली नाही. तसेच महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीमध्येही युवा मोर्चाला प्रतिनिधित्व मिळालेले नाही. त्यामुळे किमान नववे स्वीकृत सदस्य पद भारतीय जनता युवा मोर्चाला देण्यात यावे. तसेच महापालिकेच्या परिवहन समितीवर युवा मोर्चाच्या किमान पाच कार्यकर्त्यांना संधी द्यावी.

 

 

 

भाजपाकडून भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना संधी दिल्यास त्यांचा उत्साह वाढेल. पक्षाला सक्षम आणि दीर्घकालीन नेतृत्व मिळेल. तसेच भारतीय जनता पक्ष युवकांना संधी देणारा पक्ष असल्याचा समाजात अधिक प्रभावी संदेश जाईल. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी याप्रसंगी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याकडे करण्यात आली.

 

 

 

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, विश्वनाथ प्याटी, मयूर घुगे, यतिराज होनमाने, आकाश मुदगल, अंबादास पामु, अर्जुन मोहिते, ऋषिकेश चिट्टे, शिवानंद कावडे, राहुल डांगरे, देवेंद्र डेरबेरे, संदीप महाले, विशाल बनसोडे, लक्ष्मण सरवदे, प्रवीण गलांडे, ओंकार पत्तेवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button