आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या निधीतून प्रभाग २२ च्या विकासाला वेग; अंतर्गत काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
प्रभागातील कोणताही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही; आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या सहकार्याने सर्वांगीण विकासाला प्राधान्य– नगरसेवक किसन जाधव

सोलापूर –
सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मध्ये विकासकामांना गती मिळत असून, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार युवा आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम (सन २०२५-२६) अंतर्गत २० लाख रुपये खर्चित सुशील मराठी शाळा परिसर ते भैरू वस्ती येथील सोमनाथ जाधव यांच्या घरापासून जगताप यांच्या घरापर्यंतच्या अंतर्गत काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका सौ. अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड आणि नगरसेविका सौ. चैत्रालीताई शिवराज गायकवाड, यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मार्गी लागले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला .

यावेळी युवा सहकारी शिवराज गायकवाड, चेतन नागेश अण्णा गायकवाड, सोमनाथ जाधव, बालाजी गुडमेवार, संतोष आगलावे, रमेश गायकवाड, शशिकांत शिंदे, रवी ढेकळे, सुभाष गायकवाड, विनायक गायकवाड, विठ्ठल जाधव, राहुल चव्हाण, वसंत जाधव, समर्थ गायकवाड, संदीप गायकवाड तसेच परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन नगरसेवक किसन जाधव यांनी आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी नगरसेवक किसन जाधव म्हणाले की, राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या भक्कम सहकार्यामुळे प्रभाग क्रमांक २२ च्या विकासाला नवी गती मिळाली आहे. कोणताही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य,व इतर विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करून प्रभागाला सर्व सुविधा उपलब्ध असलेला हायटेक प्रभाग बनविण्याचा आमचा संकल्प आहे .

या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांनी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका सौ. अंबिकाताई नागेश अण्णा गायकवाड, सौ. चैत्रालीताई गायकवाड तसेच आमदार देवेंद्र दादा कोठे यांचे आभार व्यक्त केले.



