स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी ! मौजे विडीघरकुल कुंभारी ता. दक्षिण सोलापूर येथील घरफोडी चोरीचे 02 गुन्हे उघडकीस…
10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 110 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने जप्त करुन एकूण 1,50,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये मालाविषयी गुन्हयांची उकल करणेकामी व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथकास मालाविषयी गुन्हयांची उकल व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्हयाची उकल करणेकामी मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिजखाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद शिंपाळे व योगेश जाधव यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, मौजे ढोकबाभूळगांव ता. मोहोळ जि. सोलापूर येथील रेकॉर्डवरील इसम याने विडीघरकुल ता. दक्षिण सोलापूर येथील घरफोडी चोरी केली असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना कळविले असता, त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
सपोनि ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मोहोळ शहरातील शिवाजीचौक येथील ब्रिज खालून बातमी प्रमाणे मौजे ढोकबाभूळगांव ता. मोहोळ जि. सोलापूर येथे आले असता, तेथे बातमी प्रमाणे एक इसम उभा असलेला दिसला. त्याचा सपोनि ज्ञानदेव वाघ यांना बातमी प्रमाणे संशय आल्याने, त्यास ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला, त्यास सपोनि ज्ञानदेव वाघ यांनी विश्वासात घेवून पोलीस असल्याचे सांगून त्याचे नांव व पत्ता विचारता त्याने त्याचे नांव 1) बंडू उर्फ बंदेनवाज मधूकर पवार, वय 25 वर्षे, रा. ढोकबाभूळगांव, ता. मोहोळ जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे मिळालेल्या बातमीप्रमाणे कौशल्यपूर्ण तपास करता, त्याने मागील 03 महिन्याखाली त्याचा साथिदार नामे 2) उमेश प्रकाश काळे, रा.मलिकपेठ ता. मोहोळ जि. सोलापूर याचे सोबत मौजे विडीघरकुल कुंभारी येथे रात्रीच्या वेळी 02 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याबबात सांगितले, त्याबाबत वळसंग पोलीस ठाणे येथे गुरनं 182/2026 बीएनएस 2023 चे कलम 331(2), 331(3), 331(4), 305(अ) प्रमाणे व वळसंग पोलीस ठाणे गुरनं 183/2026 प्रमाणे गुन्हे दाखल असलेबाबत खात्री झाली. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर मालमत्ताचोरीचे एकूण 35 गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शशिकांत कोळेकर, नागेश कोणदे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार दिनेश पवार, प्रमोद शिंपाळे, अक्षय डोंगरे, योगेश जाधव, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिष बुरकुल, महिला पोलीस अंमलदार अश्विनी गोटे यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे…



