crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अँड राजेश कांबळे खून खटल्यास पुन्हा प्रारंभ : तिघांच्या महत्त्वपूर्ण साक्षी:- विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम …

 

सोलापूर

ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाली.

यातील *साक्षीदार निलेश धाराशिवकर* याने आपले साक्षीत मायताने त्याच्याकडून दोन सोन्याच्या अंगठ्या व दोन चैन बनवून घेतले होते ते त्यांनी ओळखले व त्यावर NRD असा शिक्का असल्याने ते माझ्या कडूनच बनवून घेतले आहे असे महत्त्वपूर्ण साक्ष दिली.
तर दुसरा *साक्षीदार पांडुरंग सगर* याने आपले साक्षीत अश्विनी हॉस्पिटल येथे तो IT इन्चार्ज म्हणून काम पाहतो. दि 8/6/2019 रोजीचे सायंकाळी साडे सहा ते आठ वाजेपर्यंतचे CCTV फूटेज पेनड्राईव वर पोलिसांना काढून दिले तो पेनड्राईव न्यायालयात ओळखला.
तिसरा साक्षीदार दत्तात्रय येलपले याने आपल्या साक्षीत तो अश्विनी हॉस्पिटल येथे सुरक्षा अधिकारी म्हणून कामास आहे व दि 8/6/2019 सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपी बंटी खरटमल हा त्याच्याकडे आला होता, त्यावेळी त्याच्या हातात दोन सोन्याच्या अंगठ्या व गळ्यामध्ये चैन होती, तसेच CCTV फूटेज दाखवले असता त्यामध्ये दि 8/6/2019 रोजी सायंकाळी बंटी खरटमल हा गेट मधून त्याच्या सोबत येताना व बाहेर जाताना त्याने ओळखले.अशी महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली. त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.

खटल्यास पुढील तारीख 29/08/2025 ही तारीख नेमण्यात आली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 तर्फे अँड नागराज शिंदे,आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia