india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

 

सोलापूर : प्रतिनिधी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी अक्कलकोट रस्त्यावरील श्री वीरतपस्वी मंदिर होटगी मठास भेट देऊन श्रीमद् काशी ज्ञानसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगद् गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी पालकांची जयकुमार गोरे यांनी जगद् गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींशी विविध विषयांवर चर्चा करत संवाद साधला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जगद् गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजीं यांचे आशीर्वाद मिळावेत अशी विनंती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केली.

याप्रसंगी जगद् गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, नगरसेवक शिवानंद पाटील, भाजपाच्या सरचिटणीस सुधा अल्लीमोरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button