मोगले साडी सेंटर चोरी प्रकरणी उत्तर प्रदेशचा आंतरराज्य गँगस्टरची सोलापूरात जामीनावर मुक्तता…

सोलापूर
यात हकीकत अशी की, दि. 21/11/2025 रोजी मोगले साडी सेंटर चे मालक येलदरी नेहमी प्रमाणे रात्री 9.30 वा. दुकान बंद करून गेले असता एका अज्ञात इसमाने सदर दुकानावर नजर ठेवून रक्कम रु. दहा लाख सत्तर हजार रोख स्वरूपात चोरी केली होती.
दि. 22/11/2025 रोजी येलदरी हे सकाळी 10 वा. यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले त्याच दिवशी येलदरी यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दिली होती.
दि. 15/10/2026 रोजी जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपी नामे राहुल सिंग कुशवा याला तामिळनाडू येथून अटक केली. आरोपी राहुल सिंग कुशवा यावर इतर राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार मे. रेडकर साहेब, प्रथमवर्ग न्यायदांडाधिकारी यांनी आरोपीला दि. 19/10/2026 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. भागवत इंदापूरकर यांनी दि. 19/10/2026 रोजी जमीन अर्ज आरोपीच्या वतीने दाखल करून प्रभावी उक्तिवाद केला.
त्यास सरकार पक्षाने देखील जोरदार विरोध करून युक्तिवाद केला. या मध्ये मे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा उक्तिवाद ऐकून आरोपीची तात्काळ रु.25,000/- च्या जातमुचलक्यावर जामीनावर मुक्तता केली. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. भागवत इंदापूरकर आणि ॲड.प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिले.



