लाचखोर मोटार वाहन निरीक्षक, तानाजी धुमाळ याचा बेकायदेशीर अटकेचा अर्ज न्यायालयाने फेटाळून….

यात सोलापूरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री कटारीयासाहेब यांचे न्यायालयासमोर लाचखोर मोटार वाहन निरीक्षक, तानाजी शिवाजी धुमाळ आणि खासगी इसम अमोल अप्पासाहेब पाटील यांना काल दि 25/12/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक करुन हजर केले असता आरोपीच्या वकीलाने सदर आरोपीस बेकायदेशीररीत्या अटक केली आहे आणि त्यास अटकेची कारणे सांगितली नाहीत म्हणुन ताबडतोब मुक्त करणेसाठीचा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.
सदर अर्जास सरकारपक्षातर्फे तिव्र हरकत घेवून जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंह राजपुत यांनी सरकारतर्फे म्हणणे सादर करुन युक्तीवाद केला की, सदर प्रकरणात आरोपी खासगी इसम अमोल पाटील याने मुळ फिर्यादीकडे ३,०००/- रुपयांची लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २,५००/- रुपये रकमेची लाच स्वत:करीता व मोटार वाहन निरीक्षक प्रादेशीक परीवहन कार्यालय, सोलापूर श्री. तानाजी धुमाळ यांचेकरीता स्विकारली त्यावेळी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर गोष्टीची पडताळणी करुन आरोपीला सापळा रचुन लाच घेताना रंगेहाथ पकडून त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम ७अ, १२ चे अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि सदर आरोपीस अटक करतेवेळी आरोपीच्या मित्रांना अटकेची माहीत कळवून सदर आरोपीस नोटीस देवुन अटकेची कारणेदेखील सांगितली आहेत आणि मा. सर्वोच्च न्यायालय याबाबत घालुन दिलेल्या सर्व अटी व शर्थीचे पालन करुन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जालना आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी पालन केले आहे .
त्यामुळे आरोपीचा बेकायदेशीर अटकेचा अर्ज फेटाळला जाण्यास पात्र आहे तसेच आणखी युक्तीवाद सादर केला की, सदर आरोपी मोटार वाहन निरीक्षक याने लाच स्विकारणेसाठी नांदणी येथील चेकपोस्ट नाकावर आणखी किती खासगी इसमांची नेमणुक करुन त्यांचेद्वारे किती रकमा स्विकारलेले आहेत याचा तपास करणे गरजेचे व आवश्यक असल्याने सदर आरोपीस पोलीस कोठडीची आवश्यकता आहे.
या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंह मो. राजपूत यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपीने दाखल केलेला बेकायदेशीर अटकेतुन मुक्तता होणेचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत सदर दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अॅड. डॉ. प्रदीपसिंह मो. राजपूत यांनी व आरोपीतर्फे अॅड. निलेश जोशी तसेच तपासी अंमलदार म्हणुन पोलिस उपअधिक्षक श्री. प्रशांत चौगुले, यांनी काम पाहिले.



