“शासनाच्या गोवंश संरक्षण परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची केतन शहा यांची मागणी”…

सोलापूर
दि. २२ मे २०२६
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गोवंश संरक्षण, अवैध गोतस्करी प्रतिबंध व अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई संदर्भात जारी करण्यात आलेल्या 21/05/2026 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शासन व मुंबई उच्च न्यायालय नियुक्त ऍनिमल वेलफेअर ऑफिसर व सामाजिक कार्यकर्ते केतन शहा यांनी लेखी शासन परिपत्रक सहित निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
मा, निवासी अभिजीत पाटील जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त मा.एम. राज कुमार व मा. विजय कबाडे साहेब,
पोलीस उपअधिक्षक, साो.
सोलापूर ग्रामीण सोलापूर
प्रशासन तसेच संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच इतर संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात वाढत्या गोतस्करी, अवैध गोवंश वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून त्यावर तातडीने कठोर कारवाई व्हावी.

निवेदनात अनधिकृत कत्तलखान्यांवर संयुक्त भरारी पथकांमार्फत नियमित कारवाई करणे, सीमावर्ती भागात तपासणी चौक्या कार्यान्वित करणे, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्यांचे वाहन परवाने रद्द करून कठोर कारवाई करणे तसेच डायल ११२ हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच,
शासनाने नियुक्त करण्याचे निर्देश दिलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि गोवंश संरक्षणासाठी प्रशासनाने नियमित आढावा बैठका घेण्याची आवश्यकता असल्याचेही केतन शहा यांनी निवेदनात नमूद केले आहे.
गोवंश संरक्षण ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व संवैधानिक जबाबदारी असल्याचे सांगत शासनाच्या परिपत्रकाची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्याचे आवाहन केतन शहा यांनी प्रशासनाला केले आहे.
यावेळी विजयभाऊ यादव (अध्यक्ष)
जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्था,नगरसेवक, गोरक्षक श्री सतीश अण्णा शिरसिला , राधाकृष्ण गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री अभय कुलथे, ह भ प श्री आकाश शिरते महाराज, गोरक्षक श्री पवन कोमठी, किशोर, वैद्य राजू भंडारी,
किशोर तडका, रवी बुगडे, इत्यादी उपस्थित होते



