crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अल्पवयीन पीडितेबरोबर अश्लील कृत्य करून फोटो काढल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता:-

 

HTML img Tag Simply Easy Learning

 

सोलापूर

 

बँक पासबुक काढून घेण्याकरिता आलेल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून अश्लील फोटो काढल्याच्या आरोपातून आरोपी धनाजी बिरू कोळेकर (वय-२५ वर्षे) याची विशेष न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
आरोपी धनाजी कोळेकर हा बँक मित्र म्हणून एका बँकेचे पासबुक काढून देण्याची कामे करीत होता. दि. ०१/०२/२०१८ रोजी सकाळी ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेली एक मुलगी तिचे बँक पासबुक काढण्यासाठी आरोपीचे घरी आली असता ती अनुसूचित जातीची असल्याचे माहित असूनही आरोपीने तिचा विनयभंग करून तिचे स्वतःच्या मोबाईल मध्ये अश्लील फोटो काढून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.

 

 

 

 

अशा आशयाची फिर्याद पीडितेने सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा, अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि भारतीय दंड विधाना अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली.गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त एम. बी. सकळे यांनी करून आरोपी विरुद्ध आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.

 

 

तथापि न्यायालयासमोरील उपलब्ध पुराव्यावरून आरोपी विरुद्धचे गुन्हे कायदेशीरपणे शाबीत होत नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील आल्हाद अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे अ‍ॅड. आल्हाद अंदोरे, अ‍ॅड. अथर्व अंदोरे, अ‍ॅड. सुयश पुळूजकर यांनी तर सरकार तर्फे अ‍ॅड. एस. एस. क्यातम यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button