“बुलडोझर बाबा ” अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडेंसह ५ जणांवर स्क्रॅप चोरी प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
दुपारी 4 ते 6 वेळेत स्क्रॅप साहित्याची चोरी करताना नगरसेवक अमोल शिंदे यांनी बनसोडे यांच्या सह त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना व खासगी इसमाचा केला पर्दाफाश

घटनेने खळबळ !
सोलापूर / संपादकीय
सोलापुरात गेल्या कित्येक महिन्यांपासून अतिक्रमण धारकांवर बुलडोझर बाबा अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे कारवाई करतायत. या कारवाईमुळे शहरात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. सोमवारी बनसोडे यांनी अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. कारवाईतील जप्त केलेले स्क्रॅप साहित्य सोलापूर महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागात आणण्यात आले. सेवानिवृत्त असताना पारदर्शक कारभारामुळे पुन्हा आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांना कामावर रुजू करून घेतले. बनसोडेंना आपण आपण सेवानिवृत्त अधिकारी असूनही पुन्हा आयुक्तांनी कामावर रुजू करून घेतले याचा माज आला .

रोज उठायचं पांढरा भट्टीचा शर्ट व कडक पँट घालून पोलिस बंदोबस्तासाह बुलडोझर घेऊन अतिक्रमण धारकांना अरेरावी करत शासनाचा पदसिद्ध पदाचा दुरोपयोग करून हातोडा मारायचा एवढाच काय तो बनसोडे यांचा उद्योग. पण यातही बुलडोझर बाबा कुणावर मेहरबान होतात तर कुणाचे खोके उचलतात. असाच प्रकार सोमवारी नगरसेवक अमोल शिंदे यांच्यामुळे उघडकीस आला. अतिक्रमण धारकांचे उचलेले खोके सोलापूर महानगर पालिका परिसरातील अतिक्रमण विभागात आणण्यात आले वेळ होती दुपारी ठीक ४ वाजताची. उन्हाचा कडाका ४४ अंशावर तापमान. याचाच गैरफायदा घेऊन एक खासगी मालवाहतूक वाहन अतिक्रमण विभागात पोहोचले ते जप्त केलेले साहित्य उचलण्यासाठी. जप्त केलेल्या साहित्याची कोणतीही शासकीय यादी नाही की मुद्देमाल किती आणला आहे याची आकडेवारी नाही . एका गुप्त बातमीदार मार्फत नगरसेवक अमोल शिंदे यांना फोन आला “सोलापूर महानगर पालिकेत ” जप्त केलेल्या स्क्रॅपची अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे परस्पर विक्री करतायत याची शहानिशा करण्यासाठी शिंदे अतिक्रमण विभागात पोहोचले.शिंदे पोहोचताच त्या ठिकाणी काही क्षणात कामा निमित्त भूमी मालमत्ता अधिकारी सारिका आकुलवार ही दाखल झाल्या. कारवाईतील स्क्रॅप साहित्याची चोरी होत असल्याचे नगरसेवक अमोल शिंदेंना निदर्शनास पडले. खड्या आवाजात अमोल शिंदेंनी याबाबत आवाज उठवला. स्क्रॅप साहित्य घेण्यासाठी आलेला मालवाहतूक चा वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत अमोल शिंदेंनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व भूमी मालमत्ता अधिकारी सारिका आकुलवार यांच्या समक्ष बनसोडे यांना जाब विचारला.
बनसोडे यांनी थातूर – मातुर उत्तरे दिली. क्षणार्धात सोलापूर महानगर पालिकेचे सभागृह नेते वास्तव दर्शी घटनेची माहिती कळताच अतिक्रमण विभागात पोहोचले. नगरसेवक अमोल शिंदे यांनी घडलेली हकीकत व सोलापूर महानगर पालिकेला बनसोडे कश्याप्रकारे चुना लावतायत ? हे पुराव्यानिशी स्पष्ट केलं. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी संबंधित अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणात कुणाचीही हायगय केली जाणार नाही. दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे आदेश काढले. काही क्षणात सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगर यांना घटनेची माहिती कळवण्यात आली.त्यांनीही माहिती कळताच अतिक्रमण विभाग कार्यालय गाठले. नगरसेवक अमोल शिंदे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांना घडलेली हकीकत सांगितली.

स्क्रॅप साहित्य नेण्यासाठी आलेला छोटा हत्ती { मालवाहतूक गाडीचा} वाहनचालक
दुपारी ४ ते ६ यावेळेत प्रशासनाची दिशाभूल करून अतिक्रमण धारकांच्या स्क्रॅप ची चोरी रोज होत असल्याचे निष्पन्न झाले.
“उलटा चोर कोतवाल को दाटे” या म्हणी प्रमाणे जगन्नाथ बनसोडे यांनी चुकीत सापडलेलं असतानाही सभागृह नेते नरेंद्र काळे,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, यांच्या समोर आवाज चढवला. याप्रकरणी आता तक्रारदार अविनाश अशोक वाघमारे राहणार साई गार्डन डी विंग कुमठा नाका यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतिक्रमण अधिकारी जगन्नाथ बनसोडे, जमीर हैदर इनामदार , अनोळखी इतर तीन इसम सचिन गाडे , दीपक कुंभार व देखरेख करणारे कर्मचारी यांच्या विरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात BNS कलम ३०(२),३(५) , प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती वाहन क्रमांक MH 13 CU 1583 याची किंमत अंदाजे 1 लाख रुपये जुने लोखंडी भंगार ज्याची किंमत 30 हजार रुपये असा एकूण 1 लाख 30 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पोलिस उपनिरीक्ष गजानन पाटील करत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पुढारी पण दाखवून पोलिसांचे आश्रय घेऊन कायदा पायदळी तुडवून शासनाच्या मुद्देमाल ची चोरी करून ती विक्री करणाऱ्या जगन्नाथ बनसोडे व त्यांच्या टोळीचा नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी पर्दाफाश केला आहे…



