युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवा मोर्चा कटिबद्ध
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक : युवाशक्ती जागर यात्रा उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाची भूमिका समाजापर्यंत नेण्याची जबाबदारी खांद्यावर पेलून युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवा मोर्चा कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहरच्यावतीने रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात युवाशक्ती जागर यात्रा अंतर्गत युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष श्री. महाडिक यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून भारतमातेच्या आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांनाही अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, भाजपाचे शहर सरचिटणीस शिवराज सरतापे, नगरसेवक विनोद भोसले, सत्यनारायण गुर्रम, श्रीनिवास दायमा, अक्षय अंजिखाने, प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, वनिता पाटील, मृण्मयी गवळी, अंकुश आवताडे, विश्वनाथ प्याटी, प्रकाश घोडके आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता युवा मोर्चा सारख्या संघटनांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवले. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मेहनत करत आहेत. युवकांच्या शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा या विषयात भारतीय जनता युवा मोर्चा आगामी काळात काम करणार आहे. तसेच पक्षाच्या कार्यातही भाजप पक्षाला सहकार्य करेल, असेही प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक याप्रसंगी म्हणाले. भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या भारत हा सर्वाधिक युवा असणारा देश आहे. भारतीय जनता युवा मोर्चा युवकांसाठी चांगले काम करत आहे.
अशा कार्यातूनच कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते. देशभरात सर्वाधिक राज्यात भाजपची सत्ता आहे. सोलापूर महानगरपालिका तसेच सोलापूर जिल्हा परिषदेतही आता भाजपाची सत्ता आहे. सोलापूर जिल्हा प्रदेश भाजपाच्या खांद्याला खांदा लावून नक्की काम करेल, असेही शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर याप्रसंगी म्हणाल्या.

भाजयुमोचे शहर अध्यक्ष विजय कुलथे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखून दिलेल्या मार्गावर भारतीय जनता युवा मोर्चा काम करत आहे. विकासाच्या दृष्टिकोनाला युवाशक्तीची जोड मिळण्याची ही भूमिका तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी या युवाशक्ती जागर यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचेही श्री. कुलथे याप्रसंगी म्हणाले.
भाजयुमोचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांनी प्रास्ताविक तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विश्वनाथ प्याटी, यतिराज होनमाने, तुषार पवार, विशाल बनसोडे, आकाश मुदगल, अंबादास पामू, संदीप महाले, केतन अंजीखाने, प्रवीण गलांडे, ओंकार पत्तेवार, शिवानंद कावडे, राहुल डांगरे, रतीकांत कमलापुरे, सोनू खरात, निशांत सावळे, मयूर घुगे, सुमित पाटील, लक्ष्मण सरवदे, रोहन मराठे, रोहित गोरे,
गणेश पवार, अनिकेत प्रधाने, ओंकार होमकर, गुरुनाथ कोळी, नरेश दासरी, डोंगरेश चाबुकस्वार, सूरज विटे, अर्जुन मोहिते, अप्पू माळी, अनिल वंगारी, देवेंद्र डेरबेरे, श्रवण साबळे, रविराज वाघमोडे, प्रदीप मोरे, पृथ्वीराज खेरमोडे, ओंकार पवार, रविराज हरसूरे, लखन भोसले, राघव घनाते, श्रीकांत गायकवाड, विक्रांत माळवदकर, आकाश जामदार, राकेश दांडगे, अभिषेक नामा, प्रथमेश कोटा, मनोज अंजीखाने, आशिष राजेश्वर, सोनू अंजीखाने, शुभम सदिगले आदी उपस्थित होते.



