maharashtrapoliticalsocialsolapur

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आज हुतात्मा स्मृती मंदिरात युवाशक्ती जागर यात्रा

प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची उपस्थिती : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे रविवारी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात युवाशक्ती जागर यात्रा अंतर्गत युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी दिली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार आहे.

 

 

 

या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. तसेच महापौर विनायक कोंड्याल, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांचा सोलापूरचा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात ते भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे युवक वर्गापर्यंत पोहचविण्यासाठी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी करण्याच्या कामांबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक संवाद साधणार आहेत. या युवक मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष विजय कुलथे यांनी केले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button