maharashtrapoliticalsocialsolapur

नवोदित चित्रकार स्नेहल व गोरख यांच्या पेन्सिल व पोट्रेट चित्रप्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन…

सोलापूर

 

 

नवोदित चित्रकार स्नेहल नारायणकर व गोरख निंबाळकर यांच्या ‘आर्ट व्हेंचर’ या पेन्सिल व पोट्रेट चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. डफरीन चौक येथील पु. ना. गाडगीळ अँड सन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या प्रदर्शनामध्ये विविध व्यक्तिमत्त्वांची पेन्सिल स्केचेस, वास्तवदर्शी पोट्रेट्स तसेच कलात्मक रेखाटनांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. नवोदित कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृतींनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

 

 

उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, नगरसेवक रमेश व्हटकर, मनोहर नारायणकर, चित्रकार नितीन खिलारे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले तसेच राज्य सचिव शांतप्पा काळे उपस्थित होते. मान्यवरांनी कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सिद्धाराम नालवार, शांताराम शिंदे आणि वर्षा निरंजन यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धारेराव यांनी केले.

 

 

 

या चित्रप्रदर्शनामुळे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले असून, शहरातील कला क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button