crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूरात घरफोडी व दागिने चोरी प्रकरण उघडकीस; दोन महिलांना अटक, ३.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

सोलापूर (प्रतिनिधी)

 

 

 

सोलापूर शहरात घरफोडी व दागिने चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ३ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये सुमारे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ९.५ ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे.
शहरात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गोहर हसन व सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष पंडित यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना देत तपासाला गती दिली.

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने गुप्त माहिती गोळा करत संशयितांवर पाळत ठेवली. तपासादरम्यान सिद्धेश्वर यात्रा परिसरात चोरी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिली असून तिच्याकडून चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तसेच दुसऱ्या घटनेत लग्नकार्याच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेचा शोध घेण्यात आला. सखोल तपास व तांत्रिक माहितीच्या आधारे तिला अटक करण्यात आली. तिच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

 

 

 

 

 

या दोन्ही आरोपी महिलांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीसांनी या गुन्ह्यांचा तपास करताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व स्थानिक नेटवर्कचा प्रभावी वापर केला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्यासह नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अभिजीत माने तसेच महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी आणि चालक बाबू काळे यांचा सक्रिय सहभाग होता.

 

 

पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडी व दागिने चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी व लग्नसमारंभात मौल्यवान दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia