सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाचे आणखी एक गैरप्रकरण उघडकीस
प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

सोलापूर
आपल्या प्रशासकीय सेवेत शिस्तप्रिय राखून अवैधरित्या गॅस चालविणाऱ्या व रास्त भाव दुकानदार अश्या अनेकांचे धाबे दणाणून सोडणारे प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे हे आता स्वतःच्या अधिकाराचा गैरप्रकार करत कालच प्रसार माध्यमातून एक प्रकरण उघडकीस येतो ना येतो,तोच पुन्हा एक प्रकरण चव्हाट्यावर येऊन धडकला आहे. जुळे सोलापुरातील आणखी एका रास्त भाव धान्य दुकान असलेल्या संस्थेने आपले दुकान अशोक चौक भागात स्थलांतर करुन मिळावे असा अर्ज अन्नधान्य वितरण कार्यालयात दाखल केला. मूळ अर्जात जुळे सोलापूर पासून अशोक चौक परिसर हे २ किलोमीटर अंतरावर असल्याचे नमूद केले, त्याप्रमाणे संबंधित पुरवठा निरीक्षकांनी सदर मागणी नियमबाह्य असल्याचे अहवाल वरिष्ठ कार्यालय असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकारी ह्यांच्याकडे सादर करण्यात आले. त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडून सदर प्रकरण फेटाळण्यात आले.
त्या अनुषंगाने संबंधित संस्थेने उपायुक्त कार्यालय पुरवठा विभाग पुणे येथे अपिल अर्ज दाखल केला. तिथेही त्यांचा अर्ज फेटाळला गेला, तदनंतर सदर संस्थेने अन्न व नागरिक पुरवठा मंत्री, मुबंई मंत्रालयात पुन्हा अपिल अर्ज करण्यात आले. तिथूनही फेरचौकशी होऊन मंत्री महोदयाच्या आदेशात सध्यास्थितीत असलेल्या दुकानापासून २ किलोमीटर पर्यत असलेल्या जागेत पाहणी करुन, संस्थेच्या मागणी नुसार आसपास च्या दुकानातून अपात्र शिधापत्रिका संबंधित दुकानास जोडण्यात यावे त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे असे स्पष्ट उल्लेख असताना देखील चक्क प्रभारी अन्न धान्य वितरण अधिकारी असलेले ओंकार पडोळे ह्यांनी दस्तुरखुद्द अन्न व नागरिक पुरवठा मंत्री मंत्रालय मुबंई ह्यांच्या आदेशाला फाटा देत जुळे सोलापूर पासून २ किलोमीटर अंतर न पाहता जवळपास ५ किलोमीटर असलेल्या अंतरावर दुकानाची मंजुरी दिले.त्याच प्रमाणे संबंधित दुकानास आसपास असलेल्या दुकानातून अपात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुकानात पात्र म्हणून जोडण्यात यावे असा चक्क बेकायदेशीर सूचना संबंधित कार्यालयास दिले.
आसपास असलेल्या दुकानात जे अपात्र शिधापत्रिका धारक आहेत त्यांचे उत्पन्न ५९,०००/- हजार च्या वर असलेल्यामूळेच अपात्र ठरविलेले असतानाही त्यांना अन्न सुरक्षा लाभार्थी योजनेत समाविष्ठ करण्यासाठी मोघलशाही फर्मान सोडण्यात आले. ह्यावरून प्रभारी असलेले अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे आपल्या अधिकाराचा गैरवापर केलाचा पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे.
कालच अश्याच एका बेकायदेशीर प्रकरण समोर येत पडोळे ह्यांनी आपल्या चुकीच्या कार्य पद्धतीचा खाते उघडल्याने आता हे दुसरे प्रकरण समोर आल्याने आणखी किती प्रकरण समोर येणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. आता ह्याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का ह्याकडे लक्ष वेधून आहे.

सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे लाडके “देवभाऊ” यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत
स्वागोत्सुक :- सोलापूर महानगर पालिका सर्व नगरसेवक व पदाधिकारी



