मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपाच्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण
आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस प्रशासना समवेत केली तयारीची पाहणी : विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होण्याचे सोलापूरकरांना आवाहन

.
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पोलीस प्रशासनासमवेत सभेच्या स्थळाची पाहणी केली.
यावेळी पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित, सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेल्या शब्दानुसार दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १३७८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत आणि होटगी रोड औद्योगिक वसाहतीसाठी ५६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सोलापूरकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयटी पार्क आणि सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विषयदेखील मार्गी लागला आहे.
उजनी धरण येथे फ्लोटिंग सोलार पी व्ही बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली व शाश्वत एआय कॅम्पसकरिता तब्बल एक लाख २८ हजार ८८३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. सोलापूरकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपाला भरभरून मतदान केले आहे. निवडणुकीत भाजपाला दिलेल्या यशाबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येत आहेत.
———–
कोट
विकासाच्या सोहळ्याचे होऊया साक्षीदार
सोलापूर शहर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना या विकासाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शहर-जिल्हावासियांनी उपस्थित रहावे आणि विकासाच्या सोहळ्याच्या साक्षीदार व्हावे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य
———
कोट
भाजपाच्या यशाचे कौतुक
भारतीय जनता पार्टीला सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांमध्येही मिळालेल्या भरघोस यशाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. या सोहळ्यात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
— विनायक कोंड्याल, महापौर, सोलापूर
——–
चौकट
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी अशी असेल व्यवस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी होणाऱ्या सभेसाठी १०० बाय ३०० फुटांचे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. तर सभेचे व्यासपीठ ४० बाय ६० फुटांचे व्यासपीठ असणार आहे. २० हजार जणांना बसण्याकरिता खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ५०० सोफे देखील ठेवण्यात आले आहेत.
——
चौकट
मुख्यमंत्र्यांकडून सभेसाठी विशेष सूचना
सभेला येणाऱ्या सोलापूरकरांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागरिकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी १०० मोठे कुलर लावण्यात आले आहेत. तसेच ४ टनचे ६ वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. सभास्थळी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ३० हजार पाण्याच्या बाटल्या आणि २०० पाण्याचे जार अशी मुबलक व्यवस्था करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून सभेस्थळी रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांचे पथकही राहणार आहे, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

चलो विजयी मेळावा, विजयी मेळावा, विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळा
राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत पार पडणार भव्य विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा
सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी *विजयी मेळावा* आणि आयटी पार्क, 1378 कोटींची समतोल पाणीपुरवठा योजना, MIDC मधील सुविधांकरिता 56 कोटींचा निधी, अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी, उजनी धरण येथील प्रकल्पाकरिता एक लाख 28 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या *इन्फ्रामॅन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ* यांच्या प्रमुख उपस्थितीत *कृतज्ञता सोहळा* आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने वाजत-गाजत अवश्य यावे.
स्थळ – हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर
वेळ – मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता.
स्वागतोत्सुक – आमदार देवेंद्र दादा कोठे व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर-जिल्हा



