crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अंबिका नगरमध्ये होणारा बालविवाह रोखला; पोलिस व अधिकाऱ्यांची सजगता

 

सोलापूर (प्रतिनिधी )

 

दिनांक २५/०४/२०२६ रोजी गुरुकमल मंगल कार्यालय खंडोबा मंदिर जवळ, अंबिका नगर, बाळे, सोलापुर या ठिकाणी बाल विवाह संपन्न होत आहे, अशी माहिती मिळाल्याने पोलीसांनी सदर विकाणी जावुन पाहिले असता, तेथे वधु व वर पक्षाकडील नातेवाईक जमलेले होते. साखर पुडा त्यानंतर विवाहची तयारी सुरु होती. पोलीसांनी वधु बाबत त्यांचे पालकाकडे चौकशी केली असता वधुचे वय १३ वर्षे, ६ महिने १२ दिवस होते. पोलीसांनी वधु व वर पक्षाकडील संबधितांना बाल विवाह कायदया बाबत समजुन सांगितले. तसेच दोन्ही परीवारांचे समुउपदेशन केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करुन बाल विवाह रोखण्यात आलेला आहे.

 

 

 

 

 

 

पोलीस आयुक्त  एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (एच. क्यु) गौहर हसन भा.पो.से. सहा. पोलीस आयुक्त श्री पंडीत यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर, पोलीस उप निरीक्षक अश्विनी काळे, नेम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सोलापुर शहर, पोलीस उप निरीक्षक सुतार नेम. फौजदार चावडी पो.स्टे, सोलापुर शहर तसेच महिला सुरक्षा कक्ष व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष सोलापुर शहर असे सुर्युक्तपणे यशस्वी रित्या कारवाई केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa