crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बार्शीत गांजा व अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त…

बार्शी (दि. २४ एप्रिल २०२६)

 

 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाने बार्शी शहरात गांजा विक्री तसेच अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अनेक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बार्शी शहरात गांजा विक्री व अवैध दारू व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष पथक तयार करून छापेमारी करण्यात आली.

 

 

 

दि. २३ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक कमलाकर गुमटे व त्यांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापे टाकले. यात बार्शी शहरातील गांजा विक्री करणाऱ्या आरोपींकडून सुमारे ५३४.९६ ग्रॅम गांजा व रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याशिवाय, बार्शी शहरातील एमएसईबी कार्यालयाजवळ अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे ७०,१९५ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली. संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

 

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवैध धंदे व गुन्हेगारीविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. तसेच गंभीर गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण कारवाईत पोलीस अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान असून बार्शी शहरातील अवैध व्यवसायांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

 

 

ही उल्लेखनीय कामगिरी अतुल वी. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, . प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक, कमलकार गड्डीमे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर गुळमे, जलद प्रतिसाद पथकाचे अंमलदार व वाशी शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक, चालाजी कुकडे, व इतर अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे
..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa