crimemaharashtrapoliticalsocialsolapur

मुंबई उच्च-न्यायालय कोल्हापूर खंडपीठ – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणी आरोपीस सशर्त जामीन मंजूर …

 

 

सोलापूर

 

भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच पोक्सो कायद्यांतर्ग अंतर्गत लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली व खंडणी प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी गु.र.क्र. ०६६५/२०२५ अंतर्गत आरोपी १) ओम जोगळेकर, २) फरदीन नासिर खान (वय २४ वर्षे, रा. गोल्डफिंच पेठ, उत्तर सोलापूर, सोलापूर), ३) रितेश संतोष क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ६४, ६४(२)(एम), ७८, ३०८(२), ३०८(३), ६१(२), ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ चे कलम १२ अन्वये नोंद करण्यात आला होता.

 

 

 

 

फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून घेत आरोपींनी तिच्याकडून फोटो प्राप्त करून घेतले, तसेच धमकी व ब्लॅकमेल करून आर्थिक व शारीरिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते त्यानुसार तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता .

सदर गुन्ह्यातील आरोपी फरदीन नासिर खान यास दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीचा जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे फेटाळण्यात आला होता. तद्नंतर मा. मुंबई- उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ येथे आरोपीने आपला जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

 

 

 

 

संबंधित प्रकरणात आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की, आरोपी निर्दोष असून तपास पूर्ण झाला आहे, पुढील पुराव्यांवर तो परिणाम करणार नाही तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल. आरोपीविरुद्ध कोणताही पूर्वइतिहास नाही. त्यास दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल, म्हणून जामीन मंजूर करावा अशी विनंती करण्यात आली.

सरकार पक्षातर्फे जामिनास विरोध करण्यात आला असला, तरी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मा.श्री.सचिन एस. देशमुख साहेब यांनी आरोपी फरदीन नासिर खान यास सशर्त जामीन मंजूर केला आहे.

 

 

 

 

या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. सौरभ तांदळे ,ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात ,ॲड. संकेत पवार यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa