राजासिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत सोलापुरातील श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे विराट हिंदू संमेलन संपन्न…

सोलापूर
श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित प्रभू श्रीरामांचे 51 मूर्ती वाटप व हिंदू विराट सभा दिनांक 20 मार्च 2026 रोजी कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन्स पार्क येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर , जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर,
समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मा. मिलिंदभाऊ एकबोटे साहेब, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणजे प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण व हनुमान जी यांच्या विषयातील बाल कलाकारांचे बगीतून आगमन होताच मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामांचे व छत्रपती शिवाजी महाराजांना आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांचा सन्मान मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते संपन्न झाले. मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. समाज, सद्भावना वाढविणे, तरुण पिढीला श्रीरामाच्या आदर्शांची जाणीव करून देणे आणि धार्मिक परंपरेचे जतन करणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी आपल्या प्रखर हिंदुत्ववादी शैलीत आपले प्रबोधन केले.

गोपीचंद पडळकर -उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत हिंदू समाजाच्या एकतेचा, संस्कृतीच्या जतनाचा आणि धर्माभिमानाचा प्रभावी संदेश देण्यात आला. श्रीरामाच्या आदर्शांवर चालत राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकात्मता अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मिलिंद एकबोटे-
मुसलमानाने मंदिर तोडली पण हिंदूने त्यांच्याकडून रामजन्मभूमी हिसकावून घेतली याचे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि विश्वहिंदू परिषद ला जाते
राजा सिंह ठाकुर
सिंह म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर आम्हाला मान्य नाही. ‘छावा’ चित्रपट आल्यानंतर आता संपूर्ण भारतातील हिंदूंची हीच मागणी आहे की, ती कबर उखडून फेकावी. इतिहास लिहिण्याची, धर्मकार्य करण्याची संधी फार कमी लोकांना मिळते, त्यामुळे ही संधी
गमावू नका, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केले. आमदार टी. राजा सिंह यांनी गुरुवारी (दि. १९) छत्रपती संभाजीनगर येथील ‘हिंदू राष्ट्र जागृती सभेतही औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली होती.

धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या नव्या कायद्याचे स्वागत केले. मात्र केवळ कायदा असून चालणार नाही, तर त्याची कडक अंमलबजावणी होणे. गरजेचे असल्याचे सांगितले. छत्तीसगडमध्ये धर्मांतर करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. तसाच कठोर पवित्रा महाराष्ट्रातही घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. गोवंश हत्येबाबतही चिंता व्यक्त केली. सोलापूरमधील प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी ‘लँड जिहाद’चा आरोप केला. सरकारी जमिनींवर जिथे अनधिकृतपणे ‘हिरवे झेंडे’ लावले आहेत, तिथे भगवा फडकवण्याचे कार्य करावे, असे ते म्हणाले.

यानंतर मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीने प्रभू श्रीरामांचे 51 मूर्तीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या नीटनेटक्या नियोजनासाठी श्री राम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे समस्त पदाधिकारी व श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी संपूर्ण परिसर श्रीरामय झाले होते. सर्वत्र भगवे झेंड्यांनी वातावरणात भगवेमय झाले होते. यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण ही करण्यात आले. ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कडीकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने व राधिका जाधव यांनी केले.



