crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जिद्द, मेहनत आणि मार्गदर्शनाच्या जोरावर समाधान देवकते यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड…

सोलापूर

पंढरपूर तालुक्यातील पुळुजवाडी येथील समाधान ज्ञानोबा देवकते यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
समाधान देवकते हे सन २०१३ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते. सध्या त्यांची नेमणूक सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. पोलीस दलात सेवा बजावत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि अखेर मेहनतीचे फळ मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.

 

 

या यशामागे फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राऊत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे समाधान देवकते यांनी सांगितले. तसेच मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी लायन्स अकॅडमीचे उत्तम पवार सर आणि बापूसाहेब शेळके सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शारीरिक सरावासाठी स्वराज्य अकॅडमी सोलापूरचे संस्थापक पिंटू पवार सर व मल्लू बिराजदार यांनी सहकार्य केले.

 

कर्तव्य बजावत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करून मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाधान देवकते यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button