वकिलांकडून त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी…

सोलापूर
डॉ बाबासाहेब आंबेडकर विधि मंचच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा सरकारी वकील तथा सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड. संतोष न्हावकर उपस्थित होते. कार्यक्रमात 70 नवोदित वकिलांना कायद्याची पुस्तके भेट देऊन त्यांचा विधि क्षेत्रातील पदार्पणासाठी सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. झुंबरे यांचे माता रमाई यांचे जीवनचरित्रावर समयोचित व्याख्यान झाले.

ज्येष्ठ विधिज्ञ अँड संजीव सदाफुले यांनी सर्वांना मागर्दर्शन केले. यावेळी बोलताना अँड संतोष न्हावकर यांनी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन नवोदित वकिलांसाठी स्टायपंड, इन्शुरन्स व वकील संरक्षण कायद्याच्या आवश्यकतेवर मार्गदर्शन केले. अँड. राजरत्न बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले व अँड अजय रणशृंगारे यांनी आभार मानले.

यावेळी मंचचे अध्यक्ष अँड शताब्दीकुमार दोडयानुर, कार्याध्यक्ष अँड रवी सरवदे v विधिमंचचे पदाधिकारीसह 300 वकील बांधव उपस्थित होते.



