crimemaharashtrapoliticalsocialsolapur

रेकाॅर्डवरील सराईत अंतरजिल्हा 03 गुन्हेगार जेरबंद त्यांचेकडून 04 जबरीचोरीचे व 03 वाहन चोरी व 01 आर्म अॅक्ट असे एकूण 08 गुन्हे उघडकीसस्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी…

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

 

HTML img Tag Simply Easy Learning

मा. श्री.अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयातील यांनी राश्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील रात्रीच्या वेळी प्रवास करणा-या लोकांना अडवून लुटमारकरून वाहने हिसकावून घेवून यासारखे प्रकारात वाढ झाल्याने, सदरचे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिश्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्हयातील मालाविशयीचेे गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्षन करून सुचना दिल्या होत्या.

 

 

त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे, व त्यांचे पथक कार्यालयात हजर असतना, पोकाॅ/ सागर ढोरेपाटील व अक्षय डोंगरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, इसम नामे चैतन्य षेळके रा. भोत्रा व करण भोसले रा. खांडवी ता. बार्शी हे दोघे आपले कब्जात देषी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे बाळगून बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या चारचाकी क्रमांक डभ् 14 ळ। 4210 वाहनाने बार्शी येथून सोलापूर येथे येणार असलेबाबत खात्रीषीर बातमी मिळाली.

 

 

 

त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे यांनी त्यांचे पथकासह सोलापूर बार्शी जाणारे रोडवरील मौजे कारंबा गांवच्या पुढे काही अंतरावर बातमीप्रमाणे नमूद वाहन रोडच्याकडेला एका झाडाखाली उभे असलेले दिसले. त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने, वाहनातील इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे नाव

1) चैतन्य उर्फ भैµया पांडूरंग शेळके, वय 23 वर्ष रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव,

2) करण शिवाजी भोसले, वय 22 वर्शे, रा. खांडवी ता. बार्शी

जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता, त्यांचे कब्जात दोन देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतूसे मिळून आले. त्यांचे कब्जात मिळून आलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस करता आरोपी नामे करण शिवाजी भोसले यांने सांगितले की, त्याचा आणखीन एक साथिदार असे दोघांनी मिळून कुर्डूवाडी ते बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी एका चारचाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून चोरून आणल्याचे सांगितले.

 

 

 

त्यानंतर आरोपी चैतन्य शेळके याचे कब्जात मिळून आलेल्या सोन्याचे लाॅकेट बाबत त्याने सांगितले की, मौजे आवाटी ता. करमाळा येथील बाळूमामा मंदीराजवळ बसलेल्या एका इसमाच्या गळयातील सोन्याचे लाॅकेट पाहून त्यास त्याचे इतर साथिदारास बोलावून घेवून त्यास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून बळजबरीने काढून घेतल्याचे सांगितले. पकडलेल्या आरोपीतांना 3) मारूती नागनाथ माने रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव याने पिस्टलची विक्री केल्याने त्यासही गुन्हयाचेकामी अटक केली आहे.

 

 

पकडलेल्या वरील 02 आरोपीतांकडे कौशल्यपूर्ण तपास करता, त्यांचेकडून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील व तुळजापूर तालुका पोलीस ठाणेकडील खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी नामे चैतन्य उर्फ भैµया पांडूरंग शेळके व करण शिवाजी भोसले यांचेकडून उघडकीस आलेले गुन्हयांची माहिती.

अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम जप्त मुद्देमाल

01 ) सोलापूर तालुका 285/2025 बीएनएस 3(5), आर्म अॅक्ट 3,7,25 प्रमाणे. 1,32,600 रू. किंमतीचे 02 देषी बनावटीचे पिस्टल व 03 जिवंत काडतूसे.
अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम जप्त मुद्देमाल

02) बार्शी तालुका 132/2025,बीएनएस 309(4), 3(5) व आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे. 2,00,000/- किंमतीचे एक चारचाकी वॅगनार वाहन.

03) करमाळा 416/2025,बी.एन.एस 309(4), व आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे. 1,60,000/- किंमतीचे एक दोन तोळे वजनाचे सोन्याचे लाॅकेट.

04) कामती 112/2025, बी.एन.एस 309(6), 3(5) प्रमाणे 3,04,000 रू. किंमतीचे प्रमाणे. (बाजारमुल्य)
(38 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने )

05) कुर्डूवाडी 167/2025,बी.एन.एस 304(2),
3(5) प्रमाणे 30,000 रू.
एक षाईन मोटार सायकल व एक मोबाईल फोन.

06) वैराग 146/2025,बीएनएस 303(2),
3(5) प्रमाणे. एकूण 24,000 रू.
एक एचएफ डिलक्स मोटार सायकल व मोबाईल फोन.

07) तुळजापूर पोलीस ठाणे 174/2025,बी.एन.एस 303(2),
3(5) प्रमाणे. एकूण 2,70,000 रू.
एक स्वि°ट चारचाकी कार व एक मोबाईल फोन.

08) बार्शी शहर 1111/2024,बी.एन.एस 303(2), प्रमाणे. एकूण 65,000 रू. एक बुलेट मोटार सायकल

आरोपी नामे चैतन्य उर्फ भैय्या पांडूरंग शेळके पाहिजे असलेले गुन्हे

अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम अ.क्र. अटक आरोपी आरोपीची सदयस्थिती
09 )
बार्शी शहर पोलीस ठाणे
गुरनं 353/2025 एन.डी.पी.एस व आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे 01 चैतन्य उर्फ भैµया चेतन पांडूरंग शेळके, वय 23 वर्शे, रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव पाहिजे आरोपी
अंमलीपदार्थ व आर्म अॅक्ट (एम.डी. गुन्हा)
10 परांडा पोलीस
ठाणे धाराशिव
गुरनं 77/2025 बी.एन.एस 310(4) प्रमाणे. 01 चैतन्य उर्फ भैµया चेतन पांडूरंग शेळके, वय 23 वर्शे, रा. भोत्रा, ता. परांडा जि. धाराशिव पाहिजे आरोपी.

पकडलेल्या आरोपी पैकी चैतन्य पांडूरंग शेळके रा. भोत्रा ता. परांडा जि. धाराशिव हा रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यास मागील काही महिन्यापूर्वी धाराशिव व सोलापूर या दोन जिल्हयातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार केल्यानंतर आदेशाचा भंग करून त्याने परांडा पोलीस ठाणे हद्दीत दरोडयाची तयारीचा गुन्हा करून त्याने त्याचे साथिदार यांचेसह वरील गुन्हे केले असल्याचे निश्पन्न झाले आहे. तसेच पकडलेल्या इसमांकडे मिळून आलेल्या पिस्टल व चारचाकी वाहनाबाबत त्यांचेकडे चैकशी करता त्यांनी सांगितले की, पिस्टल व चारचाकी वाहनाचा वापर करून भविश्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा उद्देष असल्याचे सांगितले. सदरची टोळी जेरबंद झाल्याने, त्यांच्या कृत्यास प्रतिबंध करण्यास पोलीसांना यश आले आहे.

 

 

 

ही कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, पोह/ धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोकाॅ/ सागर ढोरेपाटील, पोकाॅ/ अक्षय डोंगरे, महिला पोकाॅ/ सुनंदा झळके, चापोना/ समीर शेख, तसेच मोहोळ पोलीस ठाणेकडील अंमलदार दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्निल कुबेर यांनी बजावली आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button