india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर…

 

 

सोलापूर– दि. 14/10/2025

रोजीचे राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक यापूर्वी 6 नोव्हेंबर 2025 असा होता.
आता, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम-2025 जाहीर केला आहे. यामध्ये —

राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार खालीलप्रमाणे सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

 

 

राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस विधानसभेच्या मतदार यादी वरून महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक करीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरीता प्रसिद्ध करण्याचे दिनांक– 14-11-2025
प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकती व सूचना दाखल करण्याचे अंतिम दिनांक 22-11- 2025

 

 

प्रारूप मतदार याडीवरून दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या आधीप्रामाणित करून प्रसिद्ध करणे 06-12-2025

मतदान केंद्राच्या ठिकाणीची यादी प्रसिद्ध करणे 08-12- 2025

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 12-12-2025

राज्य निवडणूक आयोगाने सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button