चोरीचे महागडे 111 स्मार्टफोन हस्तगत…
जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी...

सोलापूर
दिनांक १७/०१/२०२६ रोजी जेलरोड पोलीस ठाणेकडील पोकों संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाणे यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळालेवरुन एक इसम चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी इक्बाल मैदान सोलापुर येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेवरुन जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि संदीप पाटील व पथकातील अंमलदार हे त्याठिकाणी जावुन सापळा लावला असता त्याठिकाणी एक इसम मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव फारुक महमद हनिफ पठाण वय ४२ वर्षे रा घर नं १२९ सिध्देश्वर पेठ शहापुर चाळ सोलापुर असे सांगुन सदर इसमास अधिक विश्वासात घेवुन चौकशी असता सोलापुर शहरातुन तडीपार आरोपी १. गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुणगी २. लखन तुकाराम बैरुणगी रा दोघे राहुल गांधी नगर झोपडपटटी सोलापुर यांनी सोलापुर शहरातुन विविध ठिकाणाहुन चोरी करुन विक्रीकरता आणुन दिले असल्याची कबुली दिली.
या इसमाचे ताब्यातुन एकुण १११ विविध कंपनीचे मोबाईल जप्त केले असुन त्याची एकुण किंमत तेरा लाख बाबवन्न हजार नवशे अठठावन रुपये १३.५२,९९८/- रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
ही कामगिरी एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापुर, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण सोलापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सफौ एम.डी. नदाफ, शरिफ शेख, गजानन कणगिरी, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोकों-संतोष वायदंडे, कल्लप्प देकाणे, युवराज गायकवाड, उमेश सावंत, इकरार जमादार, विठठल जाधव यांनी केली आहे.



